चंद्रपूरातील रामनवमी शोभयात्रेत संस्कार भारतीची रांगोळी ठरली आकर्षणाचे केंद्र
चंद्रपूरात श्री रामनवमी निमित्त निघालेल्या भव्य शोभयात्रेत संस्कार भारती चंद्रपूर शाखेतर्फे काढण्यात आलेली भव्य रांगोळी रामभक्तांचे लक्ष वेधून घेत आकर्षणाचे केंद्र ठरली.
संस्कार भारती चंद्रपूरचे भू अलंकरण विधा प्रमुख सुहास दुधलकर यांनी ही आकर्षक रांगोळी काढली. स्थानिक कात्यायनी रुग्णालयाच्या समोर विविध संस्कृती चिन्हाचा वापर करत काढलेल्या या रांगोळीच्या मध्यभागी प्रभू श्रीरामचंद्राची सुरेख प्रतिमा रेखाटण्यात आली. जस्मिता बोरकर आणि रोशनी जेंगठे यांनी रांगोळी रेखाटनात सुहास दूधलकर यांना सहकार्य केले. श्री रामजन्म शोभयात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रांगोळीचे कौतुक करत प्रमाणपत्र देखील संस्कार भारती पदाधिकाऱ्यांना दिले. माजी मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, भगवताचार्य मनिष महाराज यांनी संस्कार भारती पदाधिका-यांना भेटून रांगोळीचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. मनोहरलाल टहलियानी, वसंतराव थोटे यांच्या सह अनेक मान्यवरांनी भेट देत रांगोळीचे कौतुक केले.
संस्कार भारतीचे उपाध्यक्ष डॉ राम भारत, सचिव लिलेश बरदाळकर, क्षमा धर्मपुरीवार, प्राजक्ता उपरकर, अपर्णा घरोटे,भावना हस्तक, दीपाली पाचपोर, किरण पराते आदींनी शोभयात्रेचे स्वागत करत श्री रामाचे पूजन केले.