” भंडारा जिल्हा पोलीसाव्दारे आयोजित RUN With POLICE महामॅरेथान”

” भंडारा जिल्हा पोलीसाव्दारे आयोजित RUN With POLICE महामॅरेथान”

भंडारा:- दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी भंडारा जिल्हा पोलीस विभागातर्फे रन विथ पोलीस महामॅरेथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भंडारा जिल्हयातील सर्व विभागातर्फे स्पर्धा ठेवली आहे. जिल्हाधिकारी भंडारा श्री. योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक भंडारा श्री. लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात मॅरेथान स्पर्धा रेल्वे मैदान, खात रोड भंडारा येथे आयोजीत करण्यात आली होती.

सदर कार्यक्रमामध्ये पंकज सारडा, नर्सिंहम मूर्ती, अक्सिस बँक उदयोजक संस्था व इतर संस्थेचे प्रमुख कार्यकमाला उपस्थित होते. तसेच शाळा, कॉलेज, महाविद्यालय, पोलीस विभागातील अधिकारी व पोलीस अंमलदार, मॅरेथान स्पर्धेत भाग घेणा-या शाळा १. नगर परीषद गांधी विद्यालय भंडारा २. मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू. हाय. अॅन्ड ज्युनिअर कॉलेज भंडारा ३. जि. प. हाय. अॅन्ड ज्युनिअर जांब ४. जि. प. हाय. अॅन्ड ज्युनिअर कॉलेज आंधळगाव. ५. जि. प. हायस्कुल डोंगरगाव, ६. जि. प. हायस्कुल डोंगरी/ बुज, ७. जि. प. हाय. अॅन्ड ज्युनिअर कॉलेज नाकाडोंगरी, ८. जि. प. हायस्कुल चुल्हाड, ९. जि. प. हायस्कुल सिहोरा, १०. जि. प. हायस्कुल मिटेवानी, ११. जि. प. हायस्कुल देव्हाडी, १२. नगर परिषद माकडे हायस्कुल तुमसर, १३. नगर परिषद कस्तुरबा मुलीचे हायस्कुल तुमसर, १४. जि. प. हाय. अॅन्ड ज्युनिअर कॉलेज पोहरा, १५. जि. प. हायस्कुल मुरमाडी/ तुप, १६. जि. प. गांधी विद्यालय अॅन्ड ज्युनि. कॉलेज लाखनी, १७. जि. प. हायस्कुल घारगाव, १८. जि. प. जक्काद्दर ज्युनि. अॅन्ड हायस्कुल भंडारा, १९. जि. प. नूतन हायस्कल मुढरी/ बुज, २०. जि. प. हायस्कुल अॅन्ड सायन्स ज्यु. कॉलेज वरठी, २१. जि. प. हायस्कुल अॅन्ड आर्ट सायन्स ज्यु. कॉलेज पालोरा, २२. जि. प. हायस्कुल अॅन्ड ज्यु. कॉलेज मोहाडी, २३. जि. प. हायस्कुल करडी, २४. लाल बहादुर शास्त्री हायस्कुल भंडारा, २५. जकातदार माध्यमीक विद्यालय भंडारा. २६. मारोतीराव कावळे, विद्यालय, २७. रॉयल पब्लीक स्कुल, भंडारा, २८. गांधी विद्यालय पहेला, २९. जि. प. हायस्कुल बरठी, ३०. जे. एम. पटेल कॉलेज भंडारा, ३१. भागीरथा भाष्कर हायस्कुल, भंडारा, ३२. प्रगती महिला महाविद्यालय भंडारा, ३३. नुतन महाराष्ट्र विद्यालय भंडारा, ३४. स्कुल ऑफ स्कॉलर, भंडारा, ३५. सेंट पिटर्स हायस्कुल बेला भंडारा यांनी सहभाग घेतला. ५ किमी महिला व पुरुष प्रथम पारीतोषीक १५,०००, द्वितीय पारीतोषीक १०,०००, तृतीय पारीतोषीक ५,००० तसेच व १० किमी प्रथम पारीतोषीक २५,०००, द्वितीय पारीतोषीक १५,०००, तृतीय पारीतोषीक १०,००० असे ठेवण्यात आले होते. महामॅरेथान निमीत्त दौड स्पर्धेमध्ये हजर असलेल्या मनातील देशप्रेमाची भावना व उत्साह ओथंबुन वाहतांना दिसला.

कार्यकमाच्या सुरुवात स्वागत समारोहानंतर होवुन शाळा, कॉलेज, महाविद्यालय, पोलीस विभागातील अधिकारी व पोलीस अंमलदार, मॅरेथान स्पर्धेत भाग घेणा-या स्पर्धकांना स्पर्धेचा मार्ग व नियमांशी अवगत केले. सकाळी ०७.०० वा. जमलेल्या मा. जिल्हाधिकारी भंडारा श्री. योगेश कुंभेजकर, मा. पोलीस अधिक्षक श्री. लोहीत मतानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांनी हिरवी झेंडी दाखवुन स्पर्धेकरीता मार्गस्थ केले. त्यानंतर दहा किलोमिटर

दौड पुर्ण करण्याच्या ईरादयाने व स्पर्धेकांचे मनोबल उंचावण्याकरीता पोलीस अधिक्षक श्री. लोहीत मतानी व अपर पोलीस अधिक्षक श्री. ईश्वर कातकडे यांनी सुध्दा स्पर्धेमध्ये उत्फुर्तपणे सहभाग घेवुन दौड पुर्ण केली. सकाळी ७.०० वा. सुरु झालेली महामॅरेथान स्पर्धा ०८. १५ वा. संपली ज्यात १० किमी पुरुष नागराज खुरसुने

यांनी प्रथम क्रमांक पटकवला. तर साजन यादव दुसरा व प्रमोद कुमार याने तिसरा कमांक पटकावला. तसेच महिला प्राजक्ता गोडबोले हिने प्रथक कमांक पटकवला. रिया धोतरे हिने दुसरा क्रमांक पटकवला. व रुपमणी हिने तिसरा कमांक पटकविला. त्यांचप्रमाणे ५ किंमी मध्ये पुरुष १ सौरव तिवारी यांनी प्रथम क्रमांक पटकवला. तर कुणाल वाघ याने दुसरा कमांक तर नितेश जगनाडे यांने तिसरा कमांक पटकविला. मुली ५ मिताली भोयर हिने प्रथम कमांक, तर तेजस्वीनी लामकाने हिने दुसरा तर आरती भगत हिने पटकविला.

यावेळी कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधीकारी (गृह) श्री. राजकुमार थोरात, श्री. नितीनकुमार चिचोंळकर, जिवीशा जितेद्र बोरकर, पो. नि. सुर्यवंशी पो. स्टे. भंडारा, पो. नि. सुभाष बारसे वानिशा भंडारा, श्री. अभिजीत पाटील पोलीस स्टेशन वरठी, पो. उपनि. रमाकांत दिक्षीत जिवीशा भंडारा, उदयोजक संस्था व इतर संस्थेचे प्रमुख व पोलीस विभाग, शाळा, कॉलेज, महाविद्यालय येथील शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी, पोलीस विभागातील अधिकारी व पोलीस अंमलदार असे एकुण ५००० ते ६००० लोकसंख्या उपस्थित होते. पोलीस विभाग, पोलीस बाईज, न्यु इरा मोटर्स, मोहन दाडी,, प्रकाश सिंग, वंदना आबुलकर, अरुण बांडेबूचे, सुनिल पंचबुधे, सुर्यकांन्त ईलमे, ठाणेश्वर भोयर, सुनिल कुंरजेकर यांनी अथक प्रयत्न करुन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले. कार्यकमाची सांगता केली.