राज्यपाल महोदय रविवारी गडचिरोली जिल्ह्यात 

राज्यपाल महोदय रविवारी गडचिरोली जिल्ह्यात 

गडचिरोली,दि.08:– दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता मा. श्री. रमेशं बैस राज्यपाल महाराष्ट्र राज्य हे पोरला या गावी भेट देणार आहे.संकल्प विकसित भारत आणि महिला सशक्तीकरण अभियान याच्या कार्यक्रम करिता ते येणार आहे.त्यावेळी मां. धर्म राव बाबा आत्राम मंत्री ,तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार उपस्थित राहणार आहे.यावेळी विविध विभागाच्या लाभार्थी ला लाभ देण्यात येणार आहे.

तसेच सर्व विभागच्या योजनेचे स्टॉल असणार आहे.  प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली आहे.श्री. संजय मीना जिल्हाधिकारी,श्रीमती आयुशी सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री.धनाजी पाटील अतिरिक्त जिल्हाधिकारी,श्री.राजेंद्र भुयार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,श्री.प्रशांत शिर्के प्रकल्प चालक,डॉ.सचिन मडावी सहाय्यक आयुक्त ,श्री. फरेंद्र कुत्तीरकर  प्रकल्प संचालक,श्री.चेतन हिवंज उपमुख्य कार्यकारी अधिकारी , तहसीलदार ,BDO, सर्व अधिकारी यांनी आज पोरला गावाची पाहणी करून कार्यक्रमाचा आढावा घेतला.प्रशासनाची जय्यत तय्यारी सुरू असून.7-8 हजार लोक कर्यकमाचा लाभ घेणार आहे.