महानगरपालिकेच्या स्वच्छता ब्रँड अँबेसिडर म्हणून उषा बुक्कावार यांना नियुक्ती प्रमाणपत्र बहाल

महानगरपालिकेच्या स्वच्छता ब्रँड अँबेसिडर म्हणून उषा बुक्कावार यांना नियुक्ती प्रमाणपत्र बहाल

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

चंद्रपूर, दिनांक ५ : चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूरतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या उषाताई बुक्कावार यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते उषा बुक्कावार यांना नियुक्ती प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.

चंद्रपुरातील उषाताई बुक्कावार या बहुआयामी व्यक्तिमत्व असून, विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सेवा केली आहे. त्यांना बागकामाची आवड आहे. १९९२ पासून त्या बागकामाचे प्रशिक्षण घेतात. २००२ मध्ये त्यांनी महिला संस्कार कलशची स्थापना केली. यात 400 भगिनीचा सहभाग असून, गरजुंना मदत केली जाते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन विविध सामाजिक संघटनांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत विविध विकासकामे, योजना आणि संकल्पनाची माहिती जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून उषाताई बुक्कावार यांची निवड करण्यात आली आहे. महापौर कक्षात नियुक्तीपत्र देताना आयुक्त विपीन पालीवाल, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, महिला व बालकल्याण समिती सभापती पुष्पा उराडे, सभागृह नेता देवानंद वाढई यांची उपस्थिती होती.