AIF लाभार्थी जोडणी अभियान पंधरवाडा” दि.१६ ते ३१ ऑगस्ट २०२३

आत्मनिर्भर निर्भर अभियान अंतर्गत कृषी पायाभूत निधी योजना “
AIF लाभार्थी जोडणी अभियान पंधरवाडा” दि.१६ ते ३१ ऑगस्ट २०२३

गडचिरोली, दि.29: दिनांक २८/०८/२०२३ रोजी जिल्हा अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट/कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा तसेच कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने” कृषी पायाभूत निधी योजना “AIF लाभार्थी जोडणी अभियान पंधरवडा” निमित्त सोनापूर फळरोप वाटिका सभागृह, तालुका गडचिरोली जि. गडचिरोली येथे सकाळी ११:०० वाजता” कार्यक्रम पार पडला, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले पी.एन. डाखळे, प्रकल्प संचालक आत्मा गडचिरोली यांनी कृषी व आत्मा विभागांतर्गत शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, व स्वतः व गावाच्या विकासासाठी उपयोग करावा असे आवहान केले. सर्व शेतकऱ्यांना तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येऊन एकजुटीने काम करावे हे सांगितले. कार्यक्रमाचे उद्धघाटक म्हणून लाभलेले सतीश तोंडरे, जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, गडचिरोली यांनी केंद्र शासनाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी अग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड योजनेमधील विविध व्यवसाय सुरू करून लाभ घेण्याविषयी आवाहन केले. तसेच शेतकऱ्यांना बँक लोन पद्धत व त्यासंबंधी येणाऱ्या अडचणी व शंकाचे निरसन केले.
तसेच स्मार्ट प्रकल्पाच्या नोडल अधिकारी श्रीमती अर्चना राऊत- कोचरे मॅडम यांनी स्मार्ट प्रकल्प अंतर्गत मुल्यसाखळी वाढविण्यासंबंधी राइस मिल ग्रेडिंग, पॅकिंग, पीठ गिरणी, मसाला प्रक्रिया उद्योग, दालमिल, गोडाऊन, पाक हाऊस शेडिंग नेट वापरुन भाजीपाला उत्पादन शितगृह मका पासून पशुखाद्य, कोबडी, मस्या खाद्य उत्पादन यासारखे उदयोग उभेरणी करण्याविषयी मार्गदर्शन केले. यांनी कृषी पायाभूत निधी योजनेचे प्रमुख लाभार्थी सोबतच इच्छुक लाभार्थी, कृषी उद्योजक, कृषि पदवीधर कंपनीचे संचालक गटाचे अध्यक्ष यांना यामध्ये “Post Harvest Componant”- काढणी पश्चात घटक उभारण्यासाठी लागणाऱ्या कर्जासाठी व त्या कर्जाची (CGTMSE –Nabkisan ) हमी घेण्यासाठी सोबतच 3%टक्के व्याज सवलत मिळवण्यासाठी आणि इतर योजनेची सांगड घालून अनुदान (Subsidy) मिळण्याची संधी प्राप्त करण्यासाठी ,”AIF योजने विषयी संपूर्ण माहिती दिली.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले संकेत भोयर, जिल्हा संसाधन सल्लागार, गडचिरोली यांनी उद्योजकता विकासीत करून जिल्हाधिकारी कार्यालाकडून यासाठी वेळोवेळी शेतकर्यांना मदत केली जाईल असे सांगितले. श्री. वासवाडे, उपविभागीय मंडळ कृषी अधिकारी, गडचिरोली यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग (PMFME) या योजने बद्दल उपस्थित शेतकर्यांना सखोल मार्गदर्शन केले.

या वेळी प्रफुल्ल भोपये, जिल्हा अभियान व्यवस्थापक , उमेद गडचिरोली यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले. यावेळी श्रीमती नेहा पवार, तालुका कृषी अधिकारी गडचिरोली, सचिन गोटे, अर्थशास्त्र तथा वित्त सल्लागार, हेमंत उंदिरवाडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गडचिरोली, अतुल खडसे, की एक्स्पर्ट प्रायमोव्ह, पुणे, ज्ञानदीप दुर्गे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, प्रायमोव्ह, गडचिरोली हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. दुर्गे यांनी केले तर, श्री. उंदिरवाडे यांनी कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला PMFMEDRP, तसेच शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, सदस्य, गटाचे अध्यक्ष वैयक्तिक शेतकरी व महिला गटाचे शेतकरी, मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित होते. असे नोडल अधिकारी, जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्प, गडचिरोली यांनी कळविले आहे.