जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे विशेष मोहीम

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे विशेष मोहीम

            भंडारा,दि.14 :डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांचे 8 एप्रिल,2024 चे परिपत्रकानुसार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत जिल्हा जात प्रमाण पडताळणी समिती कार्यालयातर्फे समता पंधरवडयाचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच 10 ते 15 एप्रिल,2024 या कालावधीत समता पंधरवडा आहे.

           समता पंधरवडयात इयत्ता 11 वी आणि 12 वी विज्ञान शाखेतील 2023-24 मधील सर्व प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेदरम्यान विज्ञान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तालुका व महाविद्यालय निहाय संख्यात्मक माहिती समानसंधी केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालय तसेच जिल्हास्तरावर संकलित करण्यात येणार आहेत.

           समता पंधरवाडयात 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी,सीईटी देणारे विद्यार्थी,डिप्लोमाच्या तृतीय वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी,समिती कार्यालय भंडारा येथे जमा करावयाचे असून प्राप्त अर्जावर तात्काळ कार्यवाही करुन वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन जात पडताळणी वतीने कळविण्यात येत आहे.

         तसेच जिल्हयातील 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थी,सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी व डिप्लोमाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा,असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती भंडारा यांनी  कळविले आहे.