प्रति थेंब अधिक पिक ठिंबक व तुषार सिंचन बनवण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज आमंत्रित

प्रति थेंब अधिक पिक ठिंबक व तुषार सिंचन बनवण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज आमंत्रित

 

भंडारा, दि. 30 : राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक ठिंबक व तुषार सिंचन बनवण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

 

अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषि विकास योजना, प्रति थेंब अधिक पिक घटक व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना मिळून सुक्ष्म सिंचन संचासाठी 90 टक्के अनुदान देय आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील व नवबौध्द शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषि विकास योजना, प्रति थेंब अधिक पिक घटक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना मिळून सुक्ष्म संचासाठी 90 टक्के अनुदान देय राहील. ही योजनेची संपुर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.