आज पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया शिबिर

आज पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया शिबिर

भंडारा, दि. 13  : कुष्ठरोग विकृती पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन 14 जून 2022 रोजी शासकीय सामान्य रुग्णालय, भंडारा येथे करण्यात आले आहे. या शिबिरातील पात्र कुष्ठरोग रुग्णांची शस्त्रक्रिया 15 ते 17 जून दरम्यान करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेसाठी केंद्रीय कुष्ठरोग प्रशिक्षण संस्था रायपूरचे संचालक अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ डॉ. कृष्णमृर्ती कांबळे व त्यांची चमू येणार आहेत. या शिबिरात सामान्य रुग्णालयातील सर्जन, अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजियोफेरापिस्ट या सर्वांचा सहभाग असणार आहे. तरी सर्व विकृती रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.

शिबिरामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत शस्त्रक्रियेचा लाभ घेतलेल्या रुग्णांना आठ हजार तसेच शासकीय संस्थेला पाच हजार अनुदान मंजूर आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पियुश जक्कल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद शामकुवर, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. मनिषा साकोडे यांनी शिबिराचे आयोजन केले आहे. तरी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) यांनी केले आहे.