निवडणूक कर्तव्यावरील आजारी होमगार्डवर जिल्हा प्रशासनाद्वारे तातडीने उपचार

निवडणूक कर्तव्यावरील आजारी होमगार्डवर जिल्हा प्रशासनाद्वारे तातडीने उपचार

गडचिरोली दि.१३: निवडणूक कर्तव्यावर आरमोरी येथे आलेले जळगावचे होमगार्ड श्री रवींद्र अरुण जावळे वय 49 यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने जिल्हा प्रशासनाने याची तातडीने दाखल घेत त्यांना नागपूर येथे उपचारार्थ हलविले. त्यांच्यावर ऑरेंज सिटी हॉस्पिटल नागपूर येथे वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल, जिल्हा शल्य चिकित्सक श्री खंडाते यांनी सन्मन्वयाने प्रयत्न करून त्यांना तातडीने वैद्यकीय उपचाराची मदत उपलब्ध करून दिली. जिल्हा शल्य चिकित्सक श्रीखंडाते यांनी नागपूर येथे भेट देऊन रुग्णाच्या तब्येतीची पाहणी केली.