अष्टभुजा वार्डात युवतींचा भाजपात भव्य पक्षप्रवेश

अष्टभुजा वार्डात युवतींचा भाजपात भव्य पक्षप्रवेश

महिलाओं के सन्मान में भाजपा हमेशा मैदान में – डॉ. मंगेश गुलवाडे

आज दिनांक 2 एप्रिल 2024 रोज मंगळवार ला मा. ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व श्री डॉ. मंगेश गुलवाडे (माजी महानगर जिल्हाध्यक्ष भाजपा )यांच्या नेतृत्वात सामाजिक कार्यकर्त्यां सौ संगीताताई यादव यांनी आपल्या समवेत 120 महिलांचा अष्टभुजा वार्ड चंद्रपूर येथे भारतीय जनता पार्टी मध्ये सुधीर भाऊंच्या कार्याचा गौरव करत भव्य पक्ष प्रवेश करून घेतला व आपल्या हातावर भारतीय जनता पार्टी चे चिन्ह कमळ हे मेहंदी ने काढुन घेतले.
सदर पक्षप्रवेशासाठी माजी महापौर राखीताई कांचर्लावर, भाजपाचे जेष्ठ नगरसेवक देवानंदजी वाढई ,युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर , जिल्हा सचिव राकेश बोमनवार , मुग्धाताई खांडे, जयश्रीताई व स्थानिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.