सुधीरभाऊ जातीपातीच्या राजकारणाच्या पुढचे नाव – मनोहर पाऊनकर

सुधीरभाऊ जातीपातीच्या राजकारणाच्या पुढचे नाव – मनोहर पाऊनकर

सर्वसमावेशक विकास करणारे सुधीरभाऊच ठरतील विजयी शिलेदार

सुधीर मुनगंटीवार हे नाव जातीपातीच्या राजकारणाच्या पुढचे नाव आहे. सर्वच समाजासाठी काम करणारे नेते म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. १९९५ पासून आजतागायत ६ टर्म ते विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहे. या त्यांच्या विजयात कुणबी , तेली , माळी अशा विविध ओबीसी समाजबांधवांच्या प्रेमाचा सिंहाचा वाटा आहे. याच प्रेमाचे प्रतिबिंब त्यांच्या लोकसभेच्या येत्या निवडणुकीत दिसून येईल अशी भावना मनोहर पाऊनकर यांनी व्यक्त केली आहे.

दिवंगत खासदार बाळू धानोरकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी कोणती विकासकामे केली आहे याचा लेखाजोखा जनतेच्या दरबारात आहे.त्यांना काँग्रेसच्या गोटातून होणारा विरोध साऱ्या राज्याने उमेदवारी संदर्भात बघितला आहे. जातीचे नाव घेऊन निवडून यायचे व नंतर समाजबांधवांना धुडकावून लावायचे हे कुणबी समाजबांधवांनी अनुभवले आहे व हे समाजबांधवच निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला त्यांची जागा दाखवतील.

सुधीरभाउंनी जो विकास चंद्रपूर जिल्ह्यात केला आहे तो न भूतो न भविष्यती आहे. सर्वसमावेशक विकासाला त्यांनी नेहमी प्राधान्य दिले आहे. हा अमुक समाजाचा तो तमुक समाजाचा असे त्यांनी कधीच केले नाही . पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विकास या नाऱ्या नुसार सुधीरभाऊ कार्यरत आहे.त्याचेच फळ सुधीरभाऊना विजयाच्या माध्यमातून मिळणार आहे, असेही मनोहर पाऊनकर यांनी म्हटले आहे.