दुर्धर व्याधिने ग्रस्त असलेल्या युवकास केले आर्थिक सहकार्य..

दुर्धर व्याधिने ग्रस्त असलेल्या युवकास केले आर्थिक सहकार्य..

आज दिनांक 11/07/2023 रोज मंगळवारला मौजा सिंदेवाहि येथील प्रभाग क्रमांक 15 “शास्त्री चौक” येथील स्थानीक रहिवासी अशोक मुळेवार यांचा मुलगा ” विकास (विक्की मुळेवार) हा मागील काही महिन्यापासुन “एका विशेष दुर्धर व्याधिने” ग्रस्त आहे. घरातील कौटुंबिक परिस्थीती आर्थिक दृष्टया अतिशय बिकट दारिद्र्य सदृश्य बेताची असून कमावत्या व्यक्तीपैकी हा एक व्यक्ती व्याधिने आजारी पडला, त्यातच आई,वडील पत्नी सह सहा महिन्याची मुलगी असल्याने कुटुंबावर सर्वकश संकट कोसळले अश्या परिस्थीतीत त्यास स्थानिकांच्या आणि इतर सहायकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु दुर्धर व्याधिवर वेळीच उपचार न केल्यामुळे विक्की मुळेवार याची प्रकृती शारीरीक रित्या ढासळत गेली आणि त्यास “ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि” येथून हलवित पुढील उपचारार्थ जिल्ह्याच्या स्थळी हलविन्यात आले तेव्हा “कौटुंबिक परिस्थीती आधीच बेताची असल्याने” आभाळ कोसळल्यागत अवस्था वडील अशोक मुळेवार यांची झाली तेव्हा अश्या परिस्थीतीत त्यांनी “दुर्धर व्याधिने ग्रस्त” विक्की मुळेवार यास उपचारार्थ सहकार्याची अपेक्षा घेवून सहकार्य पर शब्द स्वपनिल कावळे नगराध्यक्ष न.प. सिंदेवाहि -लोनवाहि, मयुर सूचक उपाध्यक्ष न.प. सिंदेवाही-लोनवाहि, युनुसभाई शेख़ नगरसेवक न.प. सिंदेवाहि-लोनवाहि यांच्या घरी जात सदर रुगनाविषयी माहीती देत सहकार्याची भावना व्यक्त केली तेव्हा नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, उपाध्यक्ष मयूर सूचक, नगरसेवक युनुसभाई शेख़ या तिघानीही सामाजिक दायित्व, आणि रुग्नसेवे प्रतीची सामाजिक बाँधीलकी याची जपनुक करीत सदर रुग्णाची सविस्तर माहीती आणि तबियती विषयी विचारपुस करीत क्षणाचाहि विलंब न करता उपचार घेत असलेल्या सदर रुग्णास सहकार्यपर त्याच्या वडीलाचे हातात रुग्णाचे उपचारार्थ मदत दिलि या क्षणि रुग्णाचे मोठे बंधु साईनाथ मुळेवार, रामेश्वर आइंटवार, जिराबाई मुळेवार, अमोल मुळेवार, वासुदेव आलेवार, अनिल बावने, प्रेमिला गोरडवार इत्यादि मान्यवर उपस्थीत होते..