जिल्हा महिला व बालविकास विभागातर्फे “बालविवाह” तसेच“गुड टच आणि बॅड टच” जनजागृती अभियान

जिल्हा महिला व बालविकास विभागातर्फे बालविवाह तसेचगुड टच आणि बॅड टच जनजागृती अभियान

चंद्रपूर, दि. 19 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये “बालविवाह” तसेच “गुड टच आणि बॅड टच” जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. याद्वारे 1098 या टोल-फ्री क्रमांकाची देखील जनजागृती करण्यात येत आहे. न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, पांढरकवडा येथे जिल्हा चाईल्ड हेल्पलाईन तथा जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे बालविवाह आणि 1098 चाईल्ड जनजागृती कार्यक्रम तर नवयुवक माध्यमिक विद्यालय, बाबुपेठ येथे “गुड टच आणि बॅड टच” या जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शुक्ला, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. रामटेके, चाइल्ड हेल्पलाईनचे समन्वयक अभिषेक मोहूर्ले, समुपदेशिका दिपाली मसराम, सामाजिक कार्यकर्ता प्रतिभा मडावी आदींची उपस्थिती होती.

यावेळी महाविद्यालयातील उपस्थित बालकांशी संवाद साधून “बालविवाह” तसेच “गुड टच आणि बॅड टच” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबतच, 1098 या टोल-फ्री क्रमांकाची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आली.