बल्लारपूर शहरातील सराईत गुन्हेगारास ६ महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले.

बल्लारपूर शहरातील सराईत गुन्हेगारास ६ महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले.

बल्लारपुर शहरातील मौलाना आझाद वार्ड, कारवा रोड बल्लारपुर येथे राहणारा सराईत गुन्हेगार नामे- दर्शन ऊर्फ बापु अशोक तेलंग वय-२३ वर्षे याचेवर यापुर्वी जबरी चोरी, घरफोडी, शरीराविरुध्द, अवैध्यरित्या शस्त्र बाळगणे, जिवे मारण्याची धमकी देणे व दारुबंदी कायदयाअन्वये असे एकुण-२० गुन्हे नोंद आहेत. त्याचेवर यापुर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु त्याचेवर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. तो प्रतिबंधक कार्यवाही करुन सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरुध्द गंभीर दखल घेण्यात येवुन सराईत गुन्हेगार नामे- दर्शन ऊर्फ बापु अशोक तेलंग, यांचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरिता मा. उपविभागीय अधिकारी सा. बल्लारपुर यांनी सदर सराईत गुन्हेगार हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने व आगामी लोकसभा निवडणुकीचा पाश्वभुमीवर आदर्श आचार संहिता लागु असल्याने त्यास ६ महिन्याकरिता बल्लारपुर तालुका व चंद्रपुर तालुका येथुन तडिपार करण्यात आले आहे. तसेच त्यांस त्याचे नातेवाईकाकडे तालुका भद्रावती येथे नेवुन सोडण्यात आले आहे.

सदरची कारवाई पुर्ण करण्या करिता मा. मुमक्का सुदर्शन पोलीस अधिक्षक सा. चंद्रपुर, मा. रिना जनबंधु अप्पर पोलीस अधिक्षक सा., मा. दिपक साखरे सा.उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. आसिफराजा बी. शेख, पोहवा. सुनिल कामटकर, पोअं. वशिष्ठ रंगारी, पो.अं.शेखर माथनकर, मपोअं. सिमा पोरते यांनी परिश्रम घेतले. बल्लारपुर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी. याकरिता अशा प्रकारचे वारंवार गुन्हे करणारे व पोलीस कारवाईस न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारांची माहिती संकलीत करण्यात आली असुन त्यांचे विरुध्द तडीपारी अन्वये कार्यवाही प्रस्तावित आहे.