मातीच्या सन्मानासाठी आज वसुधा वंदन मेरी माटी ,मेरा देश मध्ये होणार उपक्रम

मातीच्या सन्मानासाठी आज वसुधा वंदन मेरी माटी ,मेरा देश मध्ये होणार उपक्रम

       भंडारा, दि.9 ऑगस्ट :  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मेरी माटी मेरा देश हे अभियान उत्साहाने राबविण्यात येत आहे. आज झालेल्या सामूहिक पंचप्रण प्रतिज्ञांनी जिल्हाभर देशभक्तीचे वातावरण तयार झाले आहे.

        वसुधा वंदन उपक्रमांतर्गत आज 75 ग्रामपंचायतीमध्ये चाळीस हजार 785  झाडे लावण्यात येतील अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात मेरी माटी ,मेरा देश या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम सुरू असून आज सामूहिक पंचप्रण प्रतिज्ञा घेण्यात आली. केंद्र शासनाने दिलेल्या कार्यक्रमानुसार उद्या 10 ऑगस्ट 2023 रोजी वसुधा वंदन कार्यक्रमा अंतर्गत  एकुण 75 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच, यांच्या हस्ते लोकसहभागाने 40 हजाराहून अधिक जास्त झाड लावण्यात येणार असल्याची माहिती या मोहिमेचे सदस्य सचिव उपमुख्य कार्यकारी पंचायत उमेश नंदा गवळी यांनी दिली.