सिंदेवाही तालुका पत्रकार संघातर्फे मेश्राम कुटुंबाला आर्थिक मदत

सिंदेवाही तालुका पत्रकार संघातर्फे मेश्राम कुटुंबाला आर्थिक मदत
सिंदेवाही नवरगाव रोडवरील दुचाकी वाहनाच्या धडकेत मारोती मेश्राम यांचा मृत्यू झाल्याने मेश्राम कुटुंबाला सिंदेवाही तालुका पत्रकार संघ याने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी व आर्थिक मदत करुन सामाजिक दायित्व जोपासले.
सविस्तर वृत्त असे की मारोती मेश्राम हा विटाभटीवर कामावर होता. विटाभटीवरून घराकडे येत असताना दुचाकीने जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. मारोती मेश्राम ह्याची परीस्थिती अत्यंत बिकट असल्याने मेश्राम कुटुंबावर एकप्रकारे आघात झाला. मारोती मेश्राम ह्याच्या कुटुंबात पत्नी व चार मुली आहेत. दोन मुलीची लग्न झालेली असुन दोन मुली अविवाहित आहेत. ह्या गरीब परिस्थितीत घरातील एकुलता एक कुटुंबाचा आधार गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले. ह्या घटनेची माहिती मिळताच सर्व प्रथम सिंदेवाही तालुका पत्रकार संघाचे सदस्य अमोल निनावे व अमन कुरेशी यांनी सरकारी दवाखान्यात जाऊन कुटुंबाला भेट घेऊन सांत्वना दिली. त्यानंतर संघातील सदस्यांना सुचना दिली त्यामुळे संघाच्या सदस्यांनी मेश्राम कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. जोपर्यंत मेश्राम कुटुंबाला आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत तिथेच तळ ठोकून कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे पोलीस प्रशासन व सिंदेवाही पत्रकार संघाच्या मध्यस्थी ने कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची विनंती मान्य करत कुटुंबाला चेक दिला. त्यानंतरच अंत्यसंस्कार करण्यात आले.
सिंदेवाही पत्रकार संघाला मेश्राम कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याची जाणीव झाली. त्या जाणीवेतुन सामाजिक दायित्व समजून मारोती मेश्राम यांच्या पत्नी ला त्याच्या घरी जाऊन आर्थिक मदत केली व भविष्यात काही अडीअडचणी आल्यास सिंदेवाही पत्रकार संघ कुटुंबाला होईल तशी मदत करू अशी आशा देऊन सांत्वना केली.
यावेळी सिंदेवाही पत्रकार संघाचे लक्ष्मीकांत कामतवार महेंद्र कोवले, मिथुन मेश्राम, अमन कुरेशी, संदिप बांगडे, अमोल निनावे, सुनील गेडाम, अमोल बन्सोड, प्रविण नागदेवते, जितेंद्र नागदेवते, कपिल मेश्राम, कृणाल उंदिरवाडे आक्रोश खोब्रागडे तसेच सदस्य यानी सहकार्य केले.