“भष्टाचाराला नाही म्हणा”  ही प्रतिज्ञा घेण्यात आली.

“भष्टाचाराला नाही म्हणा”  ही प्रतिज्ञा घेण्यात आली.

भंडारा:- पोलीस कार्यालय समोरील लॉन भंडारा येथे आज दि. ३०/१०/२०२३ पोलीस अधिक्षक भंडारा श्री लोहित मतानी, पोलीस उपअधिक्षक गृह श्री. पोलीस निरीक्षक श्री. सचिन पवार यांच्या उपस्थितीत “भष्टाचाराला नाही म्हणा” प्रतिज्ञा घेण्यात आली. आपल्या देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रगतीमध्ये भष्टाचार हा प्रमुख अडथळा आहे. असे मला वाटते. भ्रष्टाचार निर्मुलनासाठी सरकार, नागरिक आणि खाजगी क्षेत्र या सर्व घटकांनी संघटितपणे काम करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते.

प्रत्येक नागरिकाने दक्ष राहायला पाहिजे आणि सदैव प्रामाणिकपणा व सचोटी यांच्या उच्चतम मानकाप्रती वचनबध्द असायला हवे आणि भ्रष्टाचाराविरुध्द लढा देण्यासाठी साथ दिली पाहीजे याची मला जाणी आहे.

जीवनाच्या सर्व क्षेत्रांत सच्चेपण आणि कायद्याचे पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही. सर्व कामे प्रामाणिकपणाने आणि पारदर्शक पध्दतीने करेन. जनहितासाठी कार्य करेन. व्यक्तिगत वागणूकीत सचोटी दाखवून उदाहरण घालून देईन. भष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य अभिकरणास देईन.

सदर कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक श्री. बोरकर जिवीशा भंडारा, पोलीस निरीक्षक श्री. , उईके नक्षल सेल भंडारा, पोलीस उपनिरीक्षक श्री. दिक्षीत, राखीव पोलीस निरीक्षक श्री. रघुनाथ चौधरी, पोलीस उपनिरीक्षक श्री. रेवतकर पोलीस नियंत्रण कक्ष भंडारा, क्युआरटी व शाखेतील अंमलदार हजर होते.