जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

           भंडारा,दि.22 :जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा, येवून रॅलीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मा. डॉ. मिलींद सोमकुंवर जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा, मा. डॉ. अतुलकुमार टेंभुर्णे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक, भंडारा, डॉ. अमरदिप नंदेश्वर जिल्हा क्षयरोग अधिकारी, भंडारा, डॉ. हितेश तायडे, डॉ. रविंद्र उदापुरे व जिल्हा क्षयरोग भंडारा येथिल कर्मचारी तसेच शासकीय नींग महाविद्यालयामधील विद्यार्थी उपस्थित होते.

         सदर जनजागृती कार्यक्रमाचा मुख्य हेतु समाजातील सर्व जनतेपर्यंत क्षयरोग आजाराबाबतची माहिती पोहोचविणे व समाज क्षयमुक्त करणे हा आहे.

           क्षयरोग हा उपचाराअंती पूर्णपणे बरा होणारा आजार आहे, त्यामुळे गैरसमजुती दूर करुन क्षयमुक्तीसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन मा. डॉ. मिलींद सोमकुवर, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा यांनी या प्रसंगी केले.