औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देसाईगंज येथे भरती मेळाव्याचे आयोजन

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देसाईगंज येथे भरती मेळाव्याचे आयोजन

गडचिरोली, दि.15: SUZUKI MOTOR GUJRAT PRIVATE LIMITED या कंपनी मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देसाईगंज येथे दिनांक २२/०२/२०२३ ला सकाळी १०.०० वाजता भरती मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. व त्याच तारखेला मुलाकात घेणार आहेत. करिता वर्ष २०१८, २०१९, २०२०, २०२१ व २०२२ मध्ये Fitter, Diesel Mechanic, Motor Mechanic, Turner, Machinist, Welder, Electrician, Tool & Die Maker, Plastic Processing Operator, Tractor Mechanic and Painter General या व्यवसायातून आय. टी.आय. उत्तीर्ण झालेले उमेदवार या करीता पात्र आहेत. मागील दोन वर्षा पासून SUZUKI MOTOR या जिल्हयात भरती आयोजित करत असून २५० हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना नोक-या देण्यात आलेल्या आहेत.

सदरील भरती मेळाव्याला जास्तीत जास्त प्रमाणात उमेदवारांनी सहभागी व्हावे असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देसाईगंज यांचे कडून आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहिती करिता ९५९५७४०९१२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे प्राचार्य शास.औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देसाईगंज यांनी कळविले आहे.