भंडारा जिल्ह्यात साडेबारा हजार होर्डिंग, फ्लेक्स बॅनर, पोस्टर हटविले 

भंडारा जिल्ह्यात साडेबारा हजार होर्डिंग, फ्लेक्स बॅनर, पोस्टर हटविले 

             भंडारा,दि.21 :     11 भंडारा गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर 16 मार्च पासून आदर्श आचार संहिता सुरू झाली आहे. या आदर्श आचार संहितेचे उल्लंघण होऊ नये याकरीता एम.सी.सी कक्षाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सरकारी, सार्वजनिक व खासगी इमारतींवरील सुमारे साडेबारा हजार होर्डिंग, फलेक्स बॅनर, पोस्टर हटविण्यात आले आहे.

            11 भंडारा गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अधिसुचना 20 मार्चला जारी करण्यात आली. .त्यानंतर 16 मार्चपासून आदर्श  आचार लागली आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघण होऊ नये याकरीता जिल्हा प्रशासनाच्या आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहे.

         याकरीता भंडारा शहरासह जिल्ह्यातील सरकारी, सार्वजनिक व खासगी इमारतींवरील सुमारे साडेबारा हजार होर्डिंग, फलेक्स बॅनर, पोस्टर हटविण्याची कार्यवाही करण्यात आली. 19 एप्रिलला भंडारा जिल्ह्याती मतदान तर 6 जून ला मतमोजणी होणार आहे.27 एप्रिल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

            तत्पूर्वी लोकसभा निवडणूक शांतते पार पाडण्याकरीता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. सरकारी इमारतींवरील 2722 वॉल पेटींग, कटआऊट, होर्डिंग्ज, बॅनर, फलेक्स हटविण्यात आले. सार्वजनिक इमारतींवरील 6023 भिंतीचित्र, पोस्टर, कटआऊट,होर्डिंग्ज, बॅनर, फलेक्स, काढण्यात आले. तसेच खासगी इमारतींवर लावण्यात आलेले भिंतीचित्र ,  पोस्टर, कटआऊट, बॅनर, फलेक्स हटविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. हि कार्यवाही भंडारा, साकोली आणि तुमसर विधानसभा क्षेत्रात करण्यात आली आहे.