chandrapur I चंद्रपूर जिल्हातील सिंदेवाही नगरपंचायतीची हद्दवाढ व हद्दवढी नंतर नगरपंचायतीचे नाव सिंदेवाही-लोनवाही करणेबाबत उदघोषणेवरील आक्षेप आमंत्रित

चंद्रपूर जिल्हातील सिंदेवाही नगरपंचायतीची हद्दवाढ व हद्दवढी नंतर नगरपंचायतीचे नाव सिंदेवाही-लोनवाही करणेबाबत उदघोषणेवरील आक्षेप आमंत्रित

चंद्रपूर, दि. 17 एप्रिल : महाराष्ट्र शासन प्राथमिक उद्घोषणा नगर विकास विभाग, मंत्रालय मुंबई क्र. एमयुएन 2021/प्र.क्र.49/नवि-18 दिनांक 31/03/2021 अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 (1965 चा महा40) यांच्या कलम 6 चे पोट कलम (2) व पोटकलम (3) तरतुदीनुसार चंद्रपूर जिल्हा सिंदेवाही नगरपंचायतीची हद्द वाढ करणे तसेच हद्द वाढ तर नगरपंचायतीचे नाव सिंदेवाही – लोनवाही असे करण्याच्या दृष्टीने प्राथामिक उद्घोषण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

उक्त उद्घोषणेला आक्षेप घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, ही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे त्यांची लेखी कारणे सादर करणे आवश्यक असेल. उक्त कालावधीमध्ये मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल.