खासदार अशोक नेते यांनी मार्कंडा यात्रेदरम्यान रात्री एक तास वेळ वाढून दिली 

खासदार अशोक नेते यांनी मार्कंडा यात्रेदरम्यान रात्री एक तास वेळ वाढून दिली 

विदर्भाची काशी म्हणून मार्कंडा देवस्थानाची ओळख आहे.दरवर्षी महाशिवरात्रीला लाखो भाविक भक्तांची येथे मार्कंडेश्वर भगवान शिव मंदिर येथे पूजनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते व दरवर्षी मोठ्या उत्साहात, आनंदात यात्रा भरते. परंतु यावर्षी गृह विभागाच्या आदेशान्वये यात्रा फक्त रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत होता या विषयावर येतील दुकानदार,झुले,मोत का कुआ,हॉटेल, खानावळ चालक व छोटे मोठे व्यावसायिक यांचा प्रशासनासोबत यात्रेची वेळ वाढवण्यासाठी समस्या दर्शवली व प्रयत्न सुरू होता.
याकरिता गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांना या संबंधित सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे व सोशल मिडिया प्रमुख रमेश अधिकारी यांनी कळविले लगेचच या संदर्भात दखल घेत खासदार अशोक नेते यांनी भ्रमणध्वनीद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचाशी थेट बोलणे व चर्चा करून मार्कंडा येथे महाशिवरात्री यात्रेला एक तास वाढीव वेळ देण्यासंबंधित निर्णय घेण्यात आला.

यावेळी मागणी संबंधित सामाजिक कार्यकर्ते विलास बल्लमवार व मार्कंडा देवस्थान यात्रेतील व्यापारी, असोशियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्कंडा यात्रेसाठी एक तास वेळ वाढून दिल्याबद्दल गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांचे येतील मार्कंडा देवस्थान यात्रेतील दुकानदार व झुला व्यापारी,मोत का कुआ,तसेच छोटे मोठे व्यावसायिक असोसिएशन पदाधिकारी व भाविक भक्तांनी आभार मानले.