चंद्रपूर दि. 16 ऑक्टोबर: पणन हंगाम 2021-22 मध्ये विकेंद्रित धान व भरडधान्य योजनेअंतर्गत धान व भरड धान्य खरेदी पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्याची विनंती स्थानिक लोकप्रतिनिधीकडून करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींनी केलेल्या विनंतीस अनुसरून, पुरेशा प्रमाणात शेतकऱ्यांच्या नोंदी झाल्या नसल्यास किमान आधारभूत खरेदी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नोंदी करीता दि. 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच यापुढे पणन हंगाम 2021-22 मध्ये शेतकरी नोंदणी करिता मुदतवाढ देण्यात येणार नाही. असे कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.