केंद्र शासनाच्या विविध योजना जनकल्याणासाठी ठरत आहेत लाभदायक – खासदार अशोक नेते

केंद्र शासनाच्या विविध योजना जनकल्याणासाठी ठरत आहेत लाभदायक – खासदार अशोक नेते

ब्रम्हपुरी:-खास मंडई व मकर संक्रातीच्या शुभमुहूर्तावर ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा- मेंडकी येथे श्री गणेश नवनिर्मित नाट्य कला मंडळ,मेंडकी यांच्या सौजन्याने सामाजिक,विनोदाने नटलेले, लावणीप्रधान तिन अंकी नाटय पुष्प *संगित;-टिळा कुंकवाचा* या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले.

या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना केंद्र शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना ठरत आहेत लाभदायक यांचा फायदा सुद्धा अनेकांना होत असून यात मग दिन दलित, शोषित, पिडीत, वंचित, या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित करत अमलात आणण्याचे काम तसेच या देशाला सुजलाम् ,सुफलाम्, प्रगतीपथावर आणण्यासाठी अतोनात प्रयत्नशील करणारे एकमेव पंतप्रधान मान.नरेंद्र मोदी जी आहेत.केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.नाटकाच्या प्रयोगाला शुभेच्छा देत नाटकाचा चांगला उद्बोधन घेत आस्वाद घ्यावा असे प्रतिपादन या नाटकाचा उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.

या नाटकाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी प्रतिपादन करतांना आदीच्या युवकाच्या मनगटात ताकद होती.त्या युवकाला कलदार हातात दिलातर वाकुन टाकण्याची हिंमत होती.पण आजचा युवा वर्ग हा व्यसनाधीनतेकडे पुर्णपणे वळलेला असून भूजला पापड मोडण्याची ताकद राहीली नाही. युवक वर्ग व्यसनेच्या आहारी जाऊ नये.असे सुचक व्यकव्य अतुलभाऊ देशकर यांनी केले.

अनेक मान्यवरांनी काँग्रेसचा हल्लाबोल करित समाचार घेत आपआपले मत व्यक्त करित भाषणे केली.

या नाट्य प्रयोगाला प्रामुख्याने मंचावर उपस्थित उदघाटक -खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते, अध्यक्ष – अतुलभाऊ देशकर, भाजपा संघटन जिल्हा महामंत्री संजय गाजपुरे, प्रचार्य अरुण शेंडे सर तालुका अध्यक्ष ब्रह्मपुरी, सौ. वंदनाताई शेंडे, माजी पंचायत समिती सभापती प्रा. यशवंत आंबोरकर युवा नेते मेंडकी, मेंडकी च्या सरपंच भावनाताई इरपाते, काशिनाथ पा. थेरकर, माजी जि.प सदस्य डॉ. बालपांडे साहेब, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा तनय देशकर युवा मोर्चा जिल्हा सचिव, नगरसेवक मनोज वठे,सरपंच अनिल तिजरे, सरपंच लिलारांम राऊत, सरपंच उमेश घुले, साकेत भानारकर, ललित उरकुडे, मेंडकी भाजप अध्यक्ष राजुभाऊ आंबोरकर ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र आंबोरकर उपसरपंच सचिन गुरनुले मंडळाचे अध्यक्ष अजय ठाकरे व इतर मान्यवर व गावकरी नाटय रसिक बंधू आणि भगिनींनी उपस्थित होते.