अवैध सावकारी विरोधात प्रशासनाची धाडमोहिम माहिती देण्याचे आवाहन

अवैध सावकारी विरोधात प्रशासनाची धाडमोहिम
माहिती देण्याचे आवाहन

गडचिरोली, दि.14: जिल्ह्यात अवैध सावकारी विरोधात जिल्हा प्रशासनाच्या वतीने पोलीस विभाग व सहकार विभागाद्वारे धाडसत्र मोहिम राबविण्यात येत आहे.
अवैध सावकारी विरूद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार करवाई करण्यात येते तरी जिल्हयात अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याचे आढळल्यास, सदरची तक्रार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयात द्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे.