चंद्रपूर शहर महानगरपालिकेत राजमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना आदरांजली

चंद्रपूर शहर महानगरपालिकेत राजमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना आदरांजली
 

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

चंद्रपूर |  शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली.

महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. मनपाचे आयुक्त विपीन पालीवाल यांनीही आदरांजली वाहिली.‌ यावेळी माजी महापौर अंजली घोटेकर, सभागृहनेता देवानंद वाढई, मनपाचे उपायुक्त अशोक गराटे, तसेच अधिकारी व पदाधिकारी, कर्मचाऱ्यांची यांची उपस्थिती होती.