मोफत आयुष रोगनिदान व उपचार शिबीर संपन्न

मोफत आयुष रोगनिदान व उपचार शिबीर संपन्न

            भंडारा,दि.13 : आयुष, आरोग्य अभियान,जिल्हा रुग्णालय,भंडारा व जिल्हा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आयुष रोगानिदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आली होती.या आयुष म्हणजे आयुर्वेद,युनानी,होमिओपॅथी,योग व निसर्गोपचार आणि सिध्द चिकित्सा पध्दती होय,आयुष पध्दती भारतीय सोप्या

संस्कृतीची ओळख आहे.या दुष्परिणाम विरहीत आहेत.जिर्ण,जुनाट आजार,वातरोग त्वचारोग,भगदर,मुळव्याध, पंडुरोग यांसारख्या अनेक आजरांवर आयुष विभागात उपचार केला जातो.

         या शिबीराचा उददेश आदिवासी,ग्रामीण,दुर्गम भागातील जनतेस आयुष पध्दतीविषयी माहिती होणे व आयुष सेवेचा लाभ रुग्णांना होऊन,सर्वसामान्य जनतेला या पध्दतीचा लाभ होऊन त्यांची उपयुक्तता सिध्द व्हावी असा होता.

          यावर्षीचे शिबीर वैशिष्टयपुर्ण असून आयुर्वेद-मधुमेह विकार,होमीयोपॅथी-श्वसन संस्था विकार,योग-वातव्याधी,वार्धक्यजन्य आजार होता.या शिबिरांचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दिपचंद सोयाम,यांच्या हस्ते व अति-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अतुल टेंभुर्णे,डॉ.अमित चुटे,डॉ.भास्कर खेडीकर यांच्या उपस्थितीत पार पडले.

         तसेच शिबिराची प्रस्तावना करताना डॉ.दिपचंद सोयाम यांनी आयुष बाबत माहिती दिली व सर्व रुग्णांनी आयुष चिकित्सेचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले.या शिबिरात एकुण 176 रुग्णांची तपासणी करण्यात आली व सर्वाना मोफत औषध वाटप करण्यात आले.सदर शिबिरांचे यशस्वी आयोजनाकरिता व आयुष कार्यक्रमातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी व इतर रा.आ.अ.कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.