महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फतच्या विविध योजनांचा लाभ द्यावा-खासदार अशोक नेते.

महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फतच्या विविध योजनांचा लाभ द्यावा-खासदार अशोक नेते.

मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण मेळावा – कोटगल येथे संपन्न..

दि.२७ डिसेंबर २०२३

गडचिरोली:-मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण मेळावा मौजा-कोटगल ता.जि.गडचिरोली या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांच्या शुभहस्ते थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने करण्यात आले.

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण मेळाव्याला उद्घाटक म्हणून खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करतांना महिलांना दुय्यम दर्जा निर्माण व्हावा,महिला प्रत्येक क्षेत्रात समोर येण्यासाठी खऱ्या अर्थाने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिलांना उपलब्ध व्हावा.यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील महिला लाभार्थ्यांना एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा या करिता मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण मेळाव्याचे आयोजन मौजा कोटगल येथे करण्यात आले.
या अभियानांतर्गत महिलांना तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण, महिलांसाठी आरोग्य शिबिर, रोजगार मेळावा,विविध सरकारी योजनांचे स्टॉल, बचत गटांची नोंदणी,शक्ती गटांची महिला बचत गटांची जोडणी, महिलांना वैयक्तिक उद्योग व व्यावसायिक प्रशिक्षण,घरगुती तयार केलेल्या उत्पादन वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करणे, अशा विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना सशक्तिकरण मेळाव्यातून सक्षम करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी या मिळाव्या दरम्यान केले.

या प्रसंगी विविध योजनांचे स्टॉल व विविध योजनांचे प्रमाण पत्रके वितरित करण्यात आले.

यावेळी मंचावर प्रामुख्याने खासदार अशोक नेते,गडचिरोली चे तहसिलदार महेंद्र गणवीर, नायब तहसिलदार आर. तलांडे, नायब तहसिलदार डि. ठाकरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, भाजपा जेष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, विस्तार अधिकारी पं स बेडके, गटविकास अधिकारी सुरेंद्र गोंगले,सरपंच मारोती जेंगठे, उपसरपंच तेजप्रभा भोयर, भाजपा शहर महामंत्री केशव निंबोड,पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रकाश काळे, तालुका कृषी अधिकारी नेहा पवार,सरपंच तुषार मडावी,घनशयाम कोलते,रिता खोब्रागडे, मिना मेश्राम,तसेच मोठ्या संख्येने गावातील महिला भगिनीं व नागरिक उपस्थित होते.