महाडीबीटीद्वारे अर्ज करण्याची सुविधा 24 तास उपलब्ध

महाडीबीटीद्वारे अर्ज करण्याची सुविधा 24 तास उपलब्ध

 

भंडारा, दि. 8 : सोशल मीडियामार्फत कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची व सोडत दिनांक 15 मे 2023 पर्यंत असल्याचे व नंतर जवळपास 2 ते 3 महिने ऑनलाइन शेतकरी निवड सोडत होणार नाही. अशा आशयाचे संदेश/माहिती अज्ञाताने विविध सामाज माध्यमांवरप्रसारित केलेले आहेत.

महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल संदर्भात अशाप्रकारचा कोणताही संदेश/माहिती कृषि विभागामार्फत देण्यात आलेली नाही, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल या संगणकीय ऑनलाईन प्रणालीवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा 24 तास उपलब्ध आहे. अर्ज केलेल्या घटकांची सोडत शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांनुसार व आवश्यकतेनुसार दर आठवड्याला काढण्यात येत आहे. तरी https://mahadbt.maharashtra.gov.in/ शेतकरी योजना येथे जाऊन विविध लाभाच्या घटकांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.