जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत पदभरती सन-2023 अनुषंगाने उमेदवारांचे दस्ताऐवज पडताळणीस सुरवात

जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत पदभरती सन-2023
अनुषंगाने उमेदवारांचे दस्ताऐवज पडताळणीस सुरवात

गडचिरोली, दि.04:जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत पदभरती सन-2023 चे अनुषंगाने विविध संवर्गातील परिक्षा IBPS कंपनीकडून घेण्यात आल्या असून सदरहू संवर्गातील प्राप्त निकाल जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहेत. प्रत्येक संवर्गातील उपलब्ध रिक्त पदांचे अनुषंगाने गुणवत्तेनुसार दस्ताऐवज पडताळणीकरीता उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येऊन संबंधित उमेदवारांना दस्ताऐवज पडताळणीकरीता हजर राहण्यास ई-मेलव्दारे, पोष्टाव्दारे व संकेतस्थळाव्दारे कळविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत संवर्गातील पदाकरीता अर्ज केलेल्या उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन विविध संवर्गाच्या दस्ताऐवज पडताळणीकरीता बोलाविण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीचे अवलोकन करत राहावे. यादीत नाव अंतर्भुत असल्यास विहीत दिनांकास दस्ताऐवज पडताळणीकरीता दस्ताऐवजासह हजर राहावे. काही अपरिहार्य कारणास्तव हजर राहणे शक्य नसल्यास तसे लेखी विनंती अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारास सात दिवसांचे आत दस्ताऐवज पडताळणी करुन घेणे बंधनकारक आहे. असे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.