87 केंद्रावर 16 हजार 261 विदयार्थी देणार दहावीची परिक्षा / परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 144 लागू 

87 केंद्रावर 16 हजार 261 विदयार्थी देणार दहावीची परिक्षा

परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 144 लागू 

               भंडारा, दि. 29 : जिल्ह्यात  उदयापासून (1 मार्च)माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला (इ.10वी)  सुरवात होत आहे. परिक्षा 1 ते 26 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. सध्या बारावी म्हणजे उच्च माध्यमिक व  दहावी (माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा )केंद्राच्या ठिकाणी सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत 100 मीटर परीसरात प्रतिबंध करण्यात आला आहे. या कालावधीत परीक्षा केंद्राच्या ठिकाणी 100 मीटर परीसरातंर्गत 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाही.

          दहावीसाठी 87 केंद्रावर 16 हजार 261 विदयार्थी परिक्षा देणार आहेत.यादरम्यान कॉपीमुक्त अभियानासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.तरी पालक व विदयार्थ्यानीही कॉपीमुक्त अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी रविंद्र सलामे यांनी केले आहे.

          परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातंर्गत/ क्षेत्रातंर्गत सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नियमित व रोजचे वाहतुकी व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील.  परीक्षा केंद्राच्या 100 मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी.बुथ, पेजर, मोबाईल फोन,ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणतीही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील.