हिमोफिलीया डे केअर सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन संपन्न

हिमोफिलीया डे केअर सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन संपन्न

गडचिरोली, दि.28 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय हिमॅटॉलॉजी कार्यक्रम सुरु करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात 27 जिल्हयात हिमोफिलिया डे केअर सेंटर सुरु करण्यात आलेले आहे. हिमोफिलिया डे केअर सेंटरचे ऑनलाईन उदघाटन राज्याचे आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते दि. 26 फेब्रुवारी 2024 ला करण्यात आलेले आहे.
हिमोफिलिया सारख्या दुर्मिळ आजार असणाऱ्या रुग्णांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य मंत्री तानाजी सावंत, सचिव दिपक म्हैसकर, आयुक्त धिरज कुमार, संचालक डॉ नितिन अंबाडेकर यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हयासह 27 जिल्हयात ऑनलाईन उदघाटन हिमोफिलिया डे केअर सेंटरचे उदघाटन वार्ड न. 10 मध्ये आय.सी.यु साय. मध्ये सांय.5.00 वा. करण्यात आले.
हिमोफिलिया रुग्णास 10 ते 12 वेळा रक्तस्त्राव होण्याची संभावना असते व त्याकरीता फक्टर ॲक्ट 8 (अ) फक्टर अॅक्ट 9 (ब) फक्टर अॅक्ट 9 (ब) ची आवश्यकता असते. संपुर्ण महाराष्ट्रात आजताय ४,५०० रुग्णांची नोंद झाली आहे. हिमोफिलिया डे केअर सेंटर सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे 9 रुग्णाची नोंद झाली आहे. उदघाटनाच्या प्रसंगी आवश्यक असलेल्या हिमोफिलिया रुग्णाला Anticoagulant factor लावुन उपचारास
सुरुवात करण्यात आलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हिमोफिलिया रुग्णास आवश्यक असणाऱ्या घटकांचा तुटवडा पडु देणार नाही तसेच भविष्यात राईट टू हेल्थ बिल हे सुध्दा पास करण्याचे आश्वासन दिले आहे. कार्यक्रम प्रसंगी डॉ. सतिश साळुंके, अति जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुगणालय गडचिरोली डॉ बागराज धुर्वे, वैद्यकिय अधिकारी (बाह्य रुग्ण तपासणी ), डॉ. इंद्रजित नागदेवते फिजीशीन, डॉ.प्रफुल हुलके जिल्हा माता बाल संगोपन जि.आ.विभाग गडचिरोली., डॉ.नागदेवते, डॉ.सुनिल मडावी, डॉ. विनोद म्हशाखेत्री, डॉ. राकेश चहांदे, डॉ. अमित ठमके, डॉ. अमित साळवे इ. उपस्थित होते.
दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून हिमोफिलिया डे केअर सेंटर सुरु करण्यात आलेले असून याचा लाभ गडचिरोली जिल्हयातील रुग्णांनी लाभ घ्यावा व इतर रुग्णांना हिमोफिलिया डे केअर सेंटर ची माहिती द्यावी. असे आवाहन डॉ. सतिश सालुंकी अति. जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी केले आहे. उमेश बेलादी, विशाल ब्रदर, निलेश सुबेदार, तुराब शेख, जयेश देशमुख, मनोज गेडाम, निता बालपांडे, व जिल्हा सिकलसेल समन्वयक रचना फुलझेले यांनी कार्यक्रम यशस्वी करीता सहकार्य केले.