महात्मा बसवेश्वर सामाजिक समता – शिवा पुरस्काराकरिता अर्ज आमंत्रित

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता – शिवा पुरस्काराकरिता अर्ज आमंत्रित
गडचिरोली, दि.28 : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता – शिवा पुरस्कार नियमावली बाबतचा शासन निर्णय दिनांक 8 मार्च, 2019 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयान्वये वीरशैव – लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दाद/ दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी, जेणेकरुन या समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे यावेत याकरिता व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थांसाठी एक असे एकुण दोन पुरस्कार देण्यात येणार आहे.
सदर पुरस्कार सन 2023-24 साठी देण्याकरीता गडचिरोली जिल्हयातील इच्छुक व्यक्ती व संस्था यांनी रितसर अर्ज उपरोक्त पुरस्कारासाठी संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण गडचिरोली या कार्यालयात कार्यालयीन वेळेस दिनांक 18 मार्च 2024 रोजी पुर्वी अर्ज सादर करण्यात यावेत. अर्जाचा नमुना प्रत कार्यालयातुन प्राप्त करुन घ्यावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचे संपर्क क्र. 07132-222192 व कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा. असे आवाहन डॉ. सचिन मडावी, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, गडचिरोली यांनी केले आहे