विकसित भारत संकल्प  यात्रेचा  शुभारंभ आजपासून नगर परिषदा , ग्रामपंचायतींना  भेट देत जाणार यात्रा

विकसित भारत संकल्प  यात्रेचा  शुभारंभ आजपासून नगर परिषदा , ग्रामपंचायतींना  भेट देत जाणार यात्रा  

             भंडारा, दि.23: भारत सरकारच्या फ्लॅगशीप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचावेत यादृष्टीने  केंद्र शासनाने राज्य / केंद्र  शासित प्रदेशांचे सहकार्याने माहे एप्रील – मे , 2018 या कालावधित ग्राम स्वराज अभियान तसेच माहे जून – ऑगस्ट , 2018 या कालावधीत  विस्तारीत ग्राम स्वराज अभियान राबविले आहे.अद्यापही या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत , अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने , विकसित भारत सकल्प यात्रा या नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून दि. 15 नोव्हेंबर , 2023 ते दिनांक 26 जानेवारी , 2024 या कालावधीत आखण्यात आली आहे.

भंडारा जिल्ह्यात या यात्रेचा शुभारंभ उद्या दिनांक 24 नोव्हेंबर पासून होणार आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेची उद्दीष्टे :-

अ) विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहचणे .

ब) माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे .

क) नागरिकांशी संवाद – वैयक्तिक कथा /अनुभव शेअरींग द्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्याशी संवाद साधणे

ड) यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या  तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे .

         भंडारा जिल्हयात  यात्रेचा  शुभारंभ   दिनांक 24 नोव्हेंबर , 2023 या दिवशी करण्यात येत असून दिनांक 25 जानेवारी , 2024 पर्यंत जिल्हयात सर्व नगर परिषदा ,सर्व नगर पंचायती व सर्व ग्रामपंचायतींना  भेट देत आहे.

         या यात्रेचे समन्वय साधण्यासाठी केंद्र शासन स्तरावर , कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय , ग्रामीण विकास मंत्रालय आणि अदिवासी कार्य मंत्रालय ही ग्रामीण आणि लक्षणीय अनुसुचित जमाती लोकसंख्या  असलेल्या  क्षेत्रांसाठी नोडल मंत्रालये राहणार असून शहरी भागांसाठी , माहिती आणि प्रसारण मंत्रालय अणि गृह निर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय ही नोडल मंत्रालये राहणार आहेत.

           विकसित भारत संकल्प यात्रा या मोहीमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य स्तरावर नियोजन विभागास नोडल विभाग म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या मोहीमे अंतर्गत  जिल्हा प्रशासनाची भूमिका महत्त्वाची असून भंडारा जिल्हयामध्ये श्री. योगेश कुंभेजकर (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी , भंडारा  यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून  त्यांचे नियंत्रणात विकसित भारत संकल्प यात्रा भंडारा जिल्हयात साकार रूप घेत आहे.

           सदर यात्रेचे I E C व्हॅन  नियोजन दिनांक 24 नोव्हेंबर ते दिनांक 25 जानेवारी 2024पर्यंत करण्यात आलेले आहे.

           नगर परिषद ,नगरपंचायत , पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत स्तरावर समन्वय समिती स्थापन करण्याच्या सुचना निर्गमित करण्यात आल्या असून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर स्वागत समिती व उत्सव समिती स्थापन करण्याच्याही सुचना देण्यात आलेल्या आहेत.

           विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हयातील सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे.