23 फेब्रुवारी ते 5 मार्च  जिल्हयातील अनाथ बालकांच्या पंधरवाडा दिन आयोजन

23 फेब्रुवारी ते 5 मार्च  जिल्हयातील अनाथ बालकांच्या पंधरवाडा दिन आयोजन

           भंडारा,दि.27: जिल्ह्यातील अनाथ बालकिांच्या विविध मागण्यासंदर्भात 23 फेब्रुवारी,2024 ते 5 मार्च,2024 या कालावधीमध्ये अनाथ मुलांना आधार कार्ड,रेशन कार्ड,जातीचा दाखला,महाराष्ट्र राज्याचा अधिवास बोनाफाईड व राष्ट्रीयत्वाचा दाखला व मतदान कार्ड इत्यादी उपलब्ध करुन देण्याबाबत संपुर्ण राज्यात पंधरवाडा राबविण्यासंबंधित सूचना देण्यात आलेल्या आहेत.

             त्याअनुषंगाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,भंडारा या अनाथांच्या मदतीकरीता कक्ष स्थापन करण्यात आले आहे.रती भंडारा जिल्ह्यातील अनाथांनी कक्षास भेट देऊन आवश्यक ते प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावी,असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी भंडारा यांनी कळविले आहे.