3 ऑक्टोबर रोजी भंडारा येथे  लोकशाही दिन

3 ऑक्टोबर रोजी भंडारा येथे  लोकशाही दिन

भंडारा,दि.27 : जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी व तालुकास्तरावर  लोकशाही  दिन  राबविण्यात येतो. परंतु  2 ऑक्टोबर,2023  रोजी महात्मा  गांधी  जयंती असल्यामुळे तसेच शासकीय सुट्टी असल्याने   लगतच्या दिवशी लोकशाही  दिन  जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार दि. 3 ऑक्टोबर  2023 रोजी  दुपारी  1.00  वाजता आयोजित  करण्यात आला आहे.

        लोकशाही  दिनाच्या तक्रारीचे निकष याप्रमाणे आहेत. अर्ज विहित  नमुन्यात असावा. तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा. तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेला अर्ज, सेवा विषयक, आस्थापना  विषयक  बाबी  तसेच तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर अर्ज स्विकारले जाणार नाहीत.असे निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके यांनी कळवले आहे.