लसीकरणाने ओलांडला पाच लाखाचा टप्पा

लसीकरणाने ओलांडला पाच लाखाचा टप्पा

  • 2 डोस घेणाऱ्यांची संख्या 1 लाख 59 हजार
  • लस घेणाऱ्यांची एकूण संख्या 6 लाख 60 हजार
  • पात्र लाभार्थ्यी 9 लाख 65 हजार

भंडारा,दि.20 : कोविड 19 आजाराचा सामना करण्यासाठी ‘लस’ हाच एकमेव उपाय असून शासनाने नागरिकांना प्राधान्याने लस देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान राबवित आहे. भंडारा जिल्ह्यात लसीकरणाने वेग धरला असून लसीचा पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 5 लाखाच्या वर गेली आहे. जिल्ह्यात 5 लाख 929 लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

सर्व नागरिकांना प्राधान्याने लस देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेण्यात आली असून विशेष शिबिराचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते. ‘एकच मिशन, लसीकरण’ या ध्येयाने संपूर्ण यंत्रणा काम करत असून जिल्ह्यात आतापर्यंत पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 6 लाख 60 हजार 704 एवढी झाली आहे. यापैकी 5 लाख 929 व्यक्तींनी पहिला तर 1 लाख 59 हजार 775 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. पात्र लाभार्थ्यांची संख्या 9 लाख 65 हजार आहे.

अ.क्र.तालुकापहिला डोसदुसरा डोसएकूण
1भंडारा11834742937161284
2लाखांदूर469691355660525
3लाखनी664332185688289
4मोहाडी604211857278993
5पवनी615931899980592
6साकोली658611949685357
7तुमसर8130524359105664
            एकूण500929159775660704

  • कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी तातडीने ‘लस’ घेणे अत्यंत गरजेचे आहे. पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांनी दुसरा डोस प्राधान्याने घ्यावा. लसीकरणाला गती मिळावी यासाठी लसीकरण केंद्रात वाढ करण्यात आली आहे. लसीची उपलब्धताही आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या मिशन लसीकरण, मोहिमेत सहभागी होऊन ‘लस’ घ्यावी.- जिल्हाधिकारी संदीप कदम