1 डिसेबर,रोजी जागतिक एडस दिनानिमित्य रॅली कार्यक्रम

1 डिसेबर,रोजी जागतिक एडस दिनानिमित्य रॅली कार्यक्रम

          भंडारा,दि.01 : महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण सोसायटी,मुंबई यांचेकडून  1 डिसेबर,2023 रोजी जागतिक एडस दिनानिमित्य जिल्हयात विविध उपक्रम राबवून एचआयव्ही एडसविषयी युवक तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवून  तपासणीसाठी प्रोत्साहित करावयाचे आहे.

        त्याअनुषंगाने जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण कक्ष डापकू जिल्हा रुग्णालय,भंडाराद्वारो 1 डिसेबर,2023 सकाळी 10 वाजता शासकीय नर्सिग विद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनी करिता रॅली एचआयव्ही एडस याविषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.या रॅलीस अंदाजे 100 ते 150 विद्यार्थीनी उपस्थित होते.

       या रॅलीस अधिष्ठाता डॉ.अभय हाटेकर,जिल्हा रुग्णालय भंडारा,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दिपचंद सोयाम, व सचिव तथा जिल्हा विधी प्राधिकरण सेवा डॉ.बिजु बा.गवारे, यांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखवून रॅलीस सुरुवात करण्यात आली.

        यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अतुलकुमार टेंभुर्णे, व नेत्र शल्यचिकित्सक डॉ.प्रशांत वाघाये, तसेच इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

      यावर्षीची एडस दिनांची थिम  Let the Community Lead समाजाचा पुढाकार, एचआयव्ही एडसचा समूळ नाश कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ.लोकेश गभने, यांनी जागतिक एडस दिनाची पार्श्वीभूमि युवक व एचआयव्ही एडस जिल्हयातील उपलब्ध एचआयव्ही सेवा-सुविधा क्षयरोग,एसटीआय आरटीआय, ए.आर.टी औषधोपचार महाविद्यालय स्तरावर विविध स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन या विषयी सविस्तर माहिती दिली.

       कार्यक्रमाचे प्रमुख  सचिव जिल्हा विधी प्राधिकरण सेवा,बिजु गवारे, यांनी समाजात जीवन जगत असतांनी नैतिकता पाळणे का आवश्यक आहे.जागतिक एडस दिनाचे महत्व व विशेष खबरदारी कायदेविषयक साक्षरता या विषयावर माहिती देवून मार्गदर्शन केले.

         कार्यक्रमाचे उद्घाटक अधिष्ठाता डॉ.अभय हाटेकर,यांनी एचआयव्ही एडस याबाबत प्रतिबंधात्मक उपयोजना तसेच वेगवेगळया आजारापासून  कसे बचाव करता येईल.याकरिता स्वत:ची जबाबदारी पार पाडणे याविषयावर माहिती सादर केली.

         तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दिपचंद सोयाम, यांनी आपले अध्यक्षीय भाषणात रुग्णसेवा प्रदान करतांनी कशाप्रकारे दक्षता व खबरदारी घेण्यात यावी,तसेच शासनाकडून उपलब्ध औषध पुरवठा तसेच समाजामध्ये एचआयव्ही संसर्ग पसरविण्याचे धोका असलेले व्यक्ती यांना व्यक्तिश प्रभावी समुपदेशन करणे,एचआयव्ही तपासणी करणे का गरजेचे आहे.व उपस्थितासमोर शपथ वाचन करुन त्यांचे अवलोकन करावे इत्यादी विषयावर बोलत होते.

       कार्यान्वित विहान प्रकल्प,येथील महादेव बिसने,तसेच कर्मचारी यांचेद्वारे चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले.व मान्यवराद्वारे स्टॉलचे उद्घाटन करण्यात येवून आयईसी वाटप करण्यात आले.

      सूत्र संचालन रामेश्वर राखडे,तसेच आभार प्रदर्शन मनोज येरणे,तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी केले.