तरुणांच्या ‘जिव्हारी’ लागणारा चित्रपट २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!

तरुणांच्या ‘जिव्हारी’ लागणारा चित्रपट २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!

देशात राहणाऱ्या प्रत्येक उभरत्या तरुणाचं परदेशात जाऊन आपलं नशीब अजमावून पहाण्याचं स्वप्न असतं. परदेशात राहणाऱ्या अशाच एका तरुणाची कथा ‘जिव्हारी’ या चित्रपटात अलौकिक मांडली गेली आहे. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून प्रेक्षकांना चित्रपटाचा अद्वितीय अनुभव घेता येणार आहे.

परदेशात जाऊन नोकरी करणारा महाराष्ट्रातला एक तरुण पुन्हा आपल्या मायदेशी परततो. आपल्या गावी परत आल्यानंतर पुन्हा परदेशाची वाट न धरता इथेच आपल्या उपजीविकेचं साधन शोधण्याचा निर्णय घेतो. जवळजवळ चौदा नोकऱ्या बदलून आई वडिलांवर भार झालेला हा तरुण आयुष्यात पुढे अशी एक गोष्ट करतो, जे सर्वांनाच आश्चर्यचकित करणारं आहे. ती आश्चर्याची गोष्ट काय असेल हे प्रमुख कलावंत निकिता सुरेश कांबळे, सुयोग सुदर्शन भोरे, ओंकारसिंग उदयसिंग राजपूत, नील राजुरीकर, मनीषा दामोदर मोरे या नवोदित कलाकारांच्या टवटवीत अभिनयाने ‘जिव्हारी’ची गोष्ट कळणार आहे. चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन गणेश शंकर चव्हाण यांनी केली आहे.

“अनेक विषयांवर आधारित चित्रपट आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आणत असतो. यावेळी तरुणांना प्रेरित करेल असा आशयघन प्रेरक चित्रपट ‘जिव्हारी’ अल्ट्रा झकास ओटीटीच्या माध्यमातून आम्ही सादर करत आहोत. यापुढेही प्रेक्षकांचं तासंतास मनोरंजन होईल याकरिता आम्ही सातत्याने नवनवीन धाटणीचे चित्रपट आणण्याच्या प्रयत्नात आहोत.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.