वस्ती स्तर संस्थेची वार्षिक सभा संपन्न / महाबॅकेच्या व्यवस्थापक श्रीमती कातकडे यांचे मार्गदर्शन

वस्ती स्तर संस्थेची वार्षिक सभा संपन्न

महाबॅकेच्या व्यवस्थापक श्रीमती कातकडे यांचे मार्गदर्शन

           भंडारा,दि.7 : दिनदयाळ अंत्योदय योजनातील नगरपरिषदेच्या 31 महीला बचतगटांतील 370 महीलांना  महाबॅकेच्या व्यवस्थापक श्रीमती वैशाली कातकडे यांनी  मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय नागरी अभियाना अंतर्गत वस्ती स्तर संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.त्या संस्थेमध्ये एकूण 31 गटाचा समावेश असून 380 महिना आहे.या सर्व महिलांना मार्गदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच वाल्मिकी सभागृहात करण्यात आले.

           या शासनाच्या ज्या योजना आहेत या सर्व महिला बचत गटापर्यंत पोहोचविण्याचे  काम वस्ती स्तर संस्था करीत असल्याचे संस्था प्रमुख रंजना साखरकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. वृक्षारोपण, आरोग्य शिबीर ,माझी माती-माझा देश, घर-घर झेंडा इत्यादी उपक्रमात संस्था  सहभागी झाली होती.

यावेळी सर्वसाधारण सभा व आणि हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी

          रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची,नृत्य-लावणी व कलागुण दर्शनपर कार्यक्रम सादर करण्यात आले. .त्या कार्यक्रमाला कॅनरा बॅकेचे प्रबधंक व्यवस्थापक अमोल घोलप तसेच नेत्र रोग विशाखा जीभकाटे  व जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे,महाराष्ट्र बॅकेच्या प्रबंधक व्यवस्थापक वैशाली कातकडे , प्रदीप पडोळे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले

         समुदृय संघटीका उषा लांजेवार, रेखा आगलावे, संस्थेच्या अध्यक्षा रंजना साखरकर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन , संचालन आभार प्रदर्शन रंजना साखरकर,यांनी केले तर प्रास्तावीक  सुनीता बावणकर यांनी केले.