अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा दौरा

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा दौरा
गडचिरोली, दि.15:अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे दिनांक 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान गडचिरोली दौऱ्यावर असून त्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.
शुक्रवार, दि. 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 09.00 वा. सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथून मुरखळा, ता. चामोर्शीकडे प्रयाण. सकाळी 09.30 वा.मुरखळा, ता.चामोर्शी येथे आगमन व वारकरी संप्रदाय तथा बहुउद्देशिय मुरखळा येथे आयोजित श्रीमत भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमास विठ्ठल आश्रम, मुरखळा येथे उपस्थिती. दुपारी 12.00 वा. एटापल्ली येथे आगमन व आरोग्य शिबीर कार्यक्रमास उपस्थिती. दु.01.30 ते 02.00 वा. शासकीय विश्रामगृह, एटापल्ली येथे राखीव. दुपारी 02.30 वा.वेलगूर येथे आगमन व पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 03.30 वा. वांगेपल्ली येथे मुख्य रस्ता ते वांगेपल्ली या रस्त्याचे भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 04.00 वा. वांगेपल्ली येथून अहेरीकडे प्रयाण. सायं. 04.15 वा.राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम.
शनिवार, दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 09.45 वा.राजवाडा निवासस्थान अहेरी येथून आलापल्लीकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. क्रीडा संकुल, आलापल्ली येथे आगमन व महाआरोग्य शिबिर उद्घाटन कार्यक्रमास क्रीडा संकुल, आलापल्ली येथे उपस्थिती. सकाळी 11.00 ते दु.01.00 वा.शासकीय विश्रामगृह, आलापल्ली येथे राखीव. दुपारी 01.00 वा. आलापल्ली येथून छद्देवाडाकडे प्रयाण. दुपारी 02.00 वा. छद्देवाडा येथे आगमन व रस्त्याच्या भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 02.30 वा. छद्देवाडा येथून कमलापूरकडे प्रयाण. दुपारी 02.45 वा.कमलापुर येथे आगमन व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 03.15 वा कमलापुर येथून राजवाडा निवासस्थान, अहेरीकडे प्रयाण. सायं.04.15 वा.राजवाडा निवासस्थान, अहेरी येथे आगमन व मुक्काम.
रविवार, दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 07.00 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथून आष्टी-गडचिरोली-आरमोरी-वैरागड मार्गे मानापुरकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. मानापूर येथे आगमन व कुवारदेव यात्रेस मानापुर, ता. आरमोरी येथे उपस्थिती. सायं. 04.30 वा.आष्टी येथे आगमन व रांगोळी स्पर्धा कार्यक्रमास उपस्थिती. सायं.05.00 वा. आष्टी येथून अहेरीकडे प्रयाण. सायं.06.30 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम.
सोमवार, दि. 19 फेब्रुवारी 2024 रोजी स.06.00 वा. गांधी चौक, अहेरी येथे आगमन व भव्य मॅरेथॉन कार्यक्रमास उपस्थिती. स.09.00 वा. राजवाडा निवासस्थान, अहेरीकडे प्रयाण. स.09.05 वा.राजवाडा निवासस्थान, अहेरी येथे आगमन व राखीव. दु.01.00 वा.राजवाडा निवासस्थान, अहेरी येथून आष्टी-चामोर्शी मार्गे गडचिरोलीकडे प्रयाण. दुपारी 03.30 वा.शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन व राखीव. दु.03.45 वा.शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथून इंदिरा गांधी चौक, गडचिरोलीकडे प्रयाण. सायं.04.00 वा. इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे आगमन व शिवजयंती कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 04.30 वा. इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथून आलापल्लीकडे प्रयाण. सायं.06.45 वा. शासकीय विश्रामगृह, आलापल्ली येथे आगमन व राखीव. सायं. 07.00 वा. शासकीय विश्रामगृह, आलापल्ली येथून क्रीडा संकुल, आलापल्लीकडे प्रयाण. सायं. 07.05 वा. क्रीडा संकुल, आलापल्ली येथे आगमन व शिवजयंती निमित्त आयोजित गायक श्री. आनंद शिंदे यांच्या कार्यक्रमास उपस्थित. रात्री 08.00 वा.शासकीय विश्रामगृह, आलापल्ली येथून नागपूरकडे प्रयाण.