राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगष्ट 2023 चे आयोजन

राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगष्ट 2023 चे आयोजन

गडचिरोली, दि.23: केंद्र शासनाच्या निर्देशान्वये, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म. रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेमध्ये क्रीडा वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी स्व. मे. ध्यानचंद, हॉकीचे जादूगार यांचे जयंतीनिमीत्य राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून या दिनानिमित्य क्रीडा दिनाचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्याअनुषंगाने दिनांक 28 ते 29 ऑगष्ट 2023 या कालावधीत विविध स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व सांस्कृतिक भवन, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे करण्यात येणार आहे व दिनांक 29ऑगष्ट 2023 रोजी सकाळी 08.00 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली मार्फत क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याप्रसंगी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी दिनांक 25 ऑगष्ट 2023 पर्यंत आपला प्रवेश जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे नोंदवावा व अधिक माहिती करीता कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा. खालील तपशीलाप्रमाणे वयोगट निहाय स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

वयोगट 18 ते 40 – 100 मी. धावणे, योगा, फुटबॉल, स्वदेशी खेळ, इन्उोअर खेळामधील बॅडमिंटन, कॅरम, आर्म रेसलिंग त्याचबरोबर मनोरंजनाचे खेळ जसे लंगडी, लिंबू चमचा,

 वयोगट 41 ते 60 – 40 मी. धावणे, 300 मी. धावणे, 1 कि.मी. चालणे, खो-खो, योगा, स्वदेशी खेळ, इन्डोअर खेळ, कॅरम चेस, बॅडमिंटन, आर्म रेसलिंग,

वयोगट 60 – च्या वर 300 मी. जोरात चालणे, 1 कि.मी. चालणे, स्वदेशी खेळ,इन्डोअर खेळ चेस, कॅरम

वरील स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी

केलेले आहे.