सुगंधित तंबाखू व वाहनांसह एक आरोपी अटकेत तर दुसऱ्या आरोपींच तपास सुरू. 

सुगंधित तंबाखू व वाहनांसह एक आरोपी अटकेत तर दुसऱ्या आरोपींच तपास सुरू. 

 

पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे दिनांक 05/06/2023 रोजी सिंदेवाही टाऊन मध्ये पेट्रोलिंग करीत असताना मुखबिर द्वारे मिळालेल्या माहिती वरून एक पांढऱ्या रंगाचे बोलेरो गाडी क्र MH 35 AR 8962 थांबवून चालकास नाव गाव विचारले असता त्याने आशपाक मुन्ना शेख वय 22 वर्ष रा गोंदिया असे सांगितले सदर गाडीतील मालाची पंचा समक्ष पाहणी केली असता गाडीमध्ये 30 चुंगळी व बॉक्समध्ये 178.75 Kg. सुगंधित तंबाखू किंमत 2,67,900/- रुपये चा माल मिळून आला.बोलेरो गाडी किंमत 8,00,000 रूपे व नगदी रक्कम 2,19,500 रुपये असा एकूण 12,87,400/- रुपये चा माल मिळून आल्याने सदर माल कोणाचा आहे असे विचारले असता रवी खटवणी रा गोंदिया असे सांगितले यावरून पंचा समक्ष सविस्तर पंचनामा कार्यवाही करण्यात आली व मिळालेला माल पोलीस स्टेशन ला डिटेन करण्यात आला असून अन्न व सुरक्षा अधिकारी चंद्रपूर यांना पत्र व्यवहार करण्यात आला आजरोजी अन्न व सुरक्षा अधिकारी यांनी फिर्यादीवरून आरोपीस अटक करण्यात आली असून फरार आरोपी चा शोध घेणे सुरु आहे