अस्थिव्यंग शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन संपन्न

अस्थिव्यंग शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन संपन्न

गडचिरोली, दि.15: जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमामध्ये 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालक/विद्यार्थी यांच्या पुढील तपासणी, निदान निश्चिती, उपचार करिता “द्वितीय स्तरीय संदर्भ सेवा कक्ष” म्हणून “डीस्ट्रीक अर्ली इंटरवेन्शन सेंटर” (डीईआयसी), जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे स्थापित असून सदर डीईआयसी मध्ये जन्मता असणारे आजार, शारीरिक व बौद्धिक विकासात्मक वाढीतील दोष, जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवणारे आजार, बालपणातील आजार, अपंगत्व व इतर आढळलेल्या बालकांच्या आरोग्य तपासण्या व उपचार केले जातात.
शारीरिक व बौद्धिक विकासात्मक विलंब/वाढीतील दोष, तसेच इतर बालपणातील आजार यांच्या निदान निश्चिती, थेरपी व उपचार आपल्या जिल्ह्यामधेच उपलब्ध असावे असे जिल्हाधिकारी यांचे मानस आहे. करिता ‘डीईआयसी(डीस्ट्रीक अर्ली इंटरवेन्शन सेंटर)’ जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत ‘पेडीऑट्रीक फिजिओथेरपी युनिट’ सुरु करण्यात आले आहे. व बालके/विद्यार्थी नियमितपणे थेरेपीचा लाभ घेत आहेत.
तसेच अस्थीव्यंग बालकांच्या शस्त्रक्रियेच्या निदान व नियोजनकरिता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, संजय मीणा मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम-डीस्ट्रीक अर्ली इंटरवेन्शन सेंटर, आरोग्य विभाग, गडचिरोली तथा समग्र शिक्षा अभियान, शिक्षण विभाग, जि.प.गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिव्यंग शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक 08 फेब्रुवारी 2024 रोजी ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी व 09 फेब्रुवारी 2024 रोजी डीईआयसी, जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे करण्यात आले. जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत आखाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री.धुर्वे यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. बालरोग तज्ञ डॉ̆. तारकेश्वर उईके व डा̆.प्रशांत पेंदाम सर, संगीता मारबते अधिसेविका यांच्या उपस्थितीत शिबीर पार पडले. संदर्भित विद्यार्थ्यांची शस्त्रक्रिया पूर्व तपासणी करिता नगाई नारायणजी मेमोरियल फाउंडेशनच्या सहकार्याने प्रसिद्ध बाल अस्थिरोग तज्ञ डॉ.विराज शिंगाडे व चमू प्रविरा रुग्णालय नागपूर तसेच डॉ. मीनाक्षी वानखेडे बालरोग फिजिओथेरेपीस्ट तथा पुनर्वसन सल्लागार व सहकारी नागपूर येथील तज्ञ उपस्थित झाले.
या दोन दिवसीय अस्थिव्यंग शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिर दरम्यान संपूर्ण संदर्भित बालकांची उपस्थित विषेशज्ञ यांच्या कडून तपासणी करण्यात आली यामध्ये पहील्या दिवशी ८८ व दुसऱ्या दिवशी १०६. विद्यार्थी/बालके यांनी लाभ घेतला. यामध्ये एकूण तपासणी मधील पहील्या दिवशी ५० व दुसऱ्या दिवशी ४६ शस्त्रक्रिये करिता आणि ४६ थेरेपी करिता पात्र बालकांची निदान निश्चिती करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या अस्थिव्यंग प्रकारातील बालके/विद्यार्थी यांना शस्त्रक्रियेसाठी पालकांसोबत वेळापत्रकाप्रमाणे तृतीय स्तरावर संदर्भ सेवे करिता नियोजन करण्यात येणार आहे. व सदर सर्व शस्त्रक्रिया या मोफत होणार आहेत.
त्याचप्रमाणे नियमित फिजिओथेरेपी मुळे बालकांमध्ये पुनर्वसन होऊन आत्मविश्वास परत मिळण्यास मदत होऊ शकते. थेरेपी स्नायुमधील बदलांचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करते जसे कि स्नायू कडक होणे, सांधे आन्कुचन स्नायूंची ताकद, लवचिकता, पोश्चर, मोटर कौशल्य, गतिशीलता, दैनंदिन जीवनातील कार्यात्मक स्वात्रंत्र शस्त्रक्रिया पश्चात थेरेपी आणि एकूण जीवनाच्यागुणवत्तेत सुधारते. याकरिता पालकांना थेरेपिचे महत्व सांगण्यात आले व प्रतिनियुक्त प्रशिक्षित थेरेपीस्ट यांच्याकडून थेरेपी कशी घ्यायची याची प्रात्यक्षित करून मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान शिबिराच्या यशस्वीतेकारिता डीईआयसीतील अधिकारी/कर्मचारी, आरबीएसके समन्वयक तथा वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, समन्वयक समग्र शिक्षण विभाग, विशेष शिक्षक समग्र विभाग, एम एस डब्लू विद्धयार्थी यांनी मेहनत घेतली. असे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली डॉ. प्रमोद खंडाते यांनी कळविले आहे.