रोजगार मेळावा ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह मेळाव्यात 3 उमेदवारांची निवड  

रोजगार मेळावा ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह मेळाव्यात 3 उमेदवारांची निवड  

भंडारा,दि.01 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे मार्फत 30 नोव्हेंबर, 2023  रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा /ऑफ लाइन प्लेसमेंट ड्राईव्ह संपन्न झाला.

सदर रोजगार मेळाव्यात नागपूर येथील महिंद्रा ॲण्ड महिंद्रा ही नामांकित कंपनी सहभागी झाली होती.त्यांचे मार्फत एकूण 40 जागे करीता उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सदर मेळाव्यात एकूण  47 उमेदवारांनी उपस्थिती दर्शविली होती. त्या मध्ये 44 उमेदवारांनी प्रत्यक्ष, 3 उमेदवारांनी गुगल फॉर्म द्वारे मेळाव्यासाठी नोंदणी केली होती. त्यामधून  47 उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून त्यापैकी  3 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली आहे.

सदर रोजगार मेळाव्याच्या उदघाटनीय कार्यक्रमात उदघाटक तथा प्रमूख अतिथी म्हणून. जिल्हा परिषद सदस्य  श्रीमती कविता उईके, व जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे श्रीमती. नुतन सारवे, हे उपस्थित होते. तसेच, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सुधाकर झळके, व जिल्हा समन्वयक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे सुहास बोंदरे, तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमात महिंद्रा ॲण्ड महिंद्रा नागपूर या कंपनी कडून श्री.शुभम झेले व श्री.प्रफूल्ल राम हे प्रतिनिधी उपस्थित होते.

सहायक आयुक्त, सुधाकर झळके, यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्या मध्ये त्यांनी जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कार्यालया मार्फत ऑफलाईन प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित केले असल्याचे त्यांनी सांगीतले. उमेदवारांनी रोजगारा बाबत आपले ध्येयनिश्चतीत केले पाहिजे.कार्यालया मार्फत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेऊनही उमेदवार स्वयंरोजगार करू शकतात याबाबत उमेदवारांना सविस्तर मार्गदर्शन केले.

 तसेच जिल्हा समन्वयक अधिकारी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे सुहास बोंदरे  यांनी त्यांच्या महामंडळा मार्फत चालणा-या योजनांची समर्पक व सविस्तर उपस्थित युवक व युवतींना माहिती दिली.

 या रोजगार मेळावाच्या उदघाटनीय कार्यक्रमाचे सुत्र संचलन व आभार श्री.श.क. सय्यद, यांनी मानले.या रोजगार मेळावाय शस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कार्यालयातील सोनु उके जिल्हा कौशल्य विकास समन्वयक, श्री. श.क.सय्यद ,श्रीमती.आशालता वालदे, श्रीमती. प्रियामा कोडे , आय.जी.माटूरकर आदींनी अथक परीश्रम घेतले.