उच्च शिक्षीत तरूणा कडुन 04 चोरीच्या मोटारसायकल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

उच्च शिक्षीत तरूणा कडुन 04 चोरीच्या मोटारसायकल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

चंद्रपुर जिल्हयामध्ये होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याकरिता मा. पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक मा. महेश कोडावार यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथक तयार करुन कार्यवाही करण्याचे आदेश दिले. सदर पथकाने पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली मोसा चोरीचे रेकॉर्डवरिल गुन्हेगार शोध मोहीम पेट्रोलिग राबवीत असतांना एक इसम विना कागदपत्राची मोटारसायकल विकी करण्याकरीता आलेला आहे अशा गोपनिय माहितीच्या आधारे जिल्हा स्टेडिअम येथे जावुन सापळा रचून मो.सा चोर आरोपी नामे आरोपी नामे आशिष शालिकराम रहांगडाले, वय 25 वर्ष, रा. अष्टभुजा वार्ड, रमाबाई नगर, एकता चौक, चंद्रपुर ता.जि. चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन त्याचे कडुन खालील प्रमाणे मोटरसायकल हस्तगत करण्यात आले.

एक पांढऱ्या रंगाची एक्टीवा मोपेड गाडी कं MH34 BU-7349

एक सिमेट रंगाची एक्टीवा मोपेडगाडी कं MH 29 AG 4781

एक काळया व निळे रंगाची स्पेलडरगाडी कं MH 32 S 1335

एक काळया व लाल रंगाची एचएफ डिलक्सगाडी के एमएच ३४ बीजे ५७७३

सदर जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलपैकी 03 मोटारसायकल या पोस्टे रामनगर, जिल्हा चंद्रपुर व 01 मोटारसायकल हे पोस्टे चामोर्शी, जि. चंद्रपुर येथील आहेत. जप्त मोटारसायकल व आरोपी पुढिल तपासकामी पोस्टे रामनगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची यशस्वी कामगीरी मा. पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, यांचे नेतृत्वात, पो.उप.नि.विनोद गुरले, पो. हवा. संजय आतकुलवार, नापोअ संतोष येलपुलवार, पो.अ. नितीन रायपुरे यांनी केली.