राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार रजनी शामराव मोरे यांची पुरस्कारासाठी निवड

राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार रजनी शामराव मोरे यांची पुरस्कारासाठी निवड

Ø 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्याने पुरस्कार प्रदान

 

चंद्रपूर, दि. 6: महिला व बालविकास विभागाच्यावतीने सन 2018-19 या वर्षाचा राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार नुकताच शासनाकडून घोषित करण्यात आला आहे. सदर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी कु. रजनी शामराव मोरे (कुरेकर) यांची निवड करण्यात आली असून या पुरस्काराअंतर्गत रुपये 1,00,001 रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन दि. 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी कळविले आहे.