नि:शुल्क प्लास्टिक प्रोसेसिंग व ब्लो मौल्डींग मशीन ऑपरेटर प्रशिक्षण Ø 8 फेब्रुवारी रोजी मुलाखतीचे आयोजन

नि:शुल्क प्लास्टिक प्रोसेसिंग व ब्लो मौल्डींग मशीन ऑपरेटर प्रशिक्षण

Ø 8 फेब्रुवारी रोजी मुलाखतीचे आयोजन

चंद्रपूर, दि.07 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गाकरीता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूरद्वारा प्लास्टिक प्रोसेसिंग व ब्लो मोल्डिंग मशीन ऑपरेटर प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.

सदर प्रशिक्षण 9 फेब्रुवारी ते 24 मार्च 2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येत असून त्याकरीता मुलाखत गुरुवार, दि. 8 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता एम.सी.ई.डी.,उद्योग भवन, दुसरा माळा, खोली क्र. 208, बस स्टॉप समोर, चंद्रपूर येथे पार पडणार आहे.

तरी, इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरीता एम.सी.ई.डी.,उद्योग भवन, कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहावे. तसेच प्रशिक्षणाच्या अधिक माहितीकरीता 07172-274416 या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर अथवा एम.सी.ई.डी.चे प्रकल्प अधिकारी संदीप जाने यांच्या 9637536041 भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी संदीप जाने यांनी कळविले आहे.