खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात गडचिरोलीत स्वच्छ्ता अभियान व ‘माझी माती – माझा देश’ उपक्रम संपन्न…

खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात गडचिरोलीत स्वच्छ्ता अभियान व ‘माझी माती – माझा देश’ उपक्रम संपन्न…
जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्यासह जिल्हाधिकारी व पदाधिकाऱ्यांचा सहभाग

गडचिरोली – स्वच्छतेचा जागर करण्या साठी ‘स्वच्छता पंधरवडा – स्वच्छता ही सेवा’ अभियाना अंतर्गत दि.०१ ऑक्टोबर रोजी, एक तास’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी होऊन श्रमदान करण्याचे आवाहन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांनी देशातील जनतेला केले होते.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने खासदार श्री. अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे यांच्या नेतृत्वात इंदिरा गांधी चौक येथे स्वतः हातात झाडू घेऊन शेकडो कार्यकर्त्यानसह या उपक्रमात सहभागी होऊन सभोवतालचा परिसर स्वच्छ – सुंदर ठेवण्यासाठी श्रमदान केले.

गडचिरोली शहरात भारतीय जनता पक्षासह जिल्हा व नगर परिषद प्रशासनाच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वच्छता अभियान आणि ‘माझी माती, माझा देश’ हा उपक्रम राबवून संपन्न झाला. शहराच्या इंदिरा गांधी चौकासह बस स्थानक, कॅाम्प्लेक्स भागातही हे अभियान राबविण्यात आले. खासदार अशोक नेते यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हाधिकारी संजय मीना, आ.डॅा.देवराव होळी, न.प.मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, तसेच अनेक अधिकारी व पदाधिकारी यात सहभागी झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून (दि.१७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत (२ ऑक्टोबर) सुरू असलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता-सेवा पंधरवाडा’अंतर्गत दररोज विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी स्वच्छता अभियान राबवून शहरवासियांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. यावेळी इंदिरा गांधी चौकातील ररस्त्यांसह लगतच्या अस्वच्छ परिसराची स्वच्छता करण्यात आली. “माझी माती, माझा देश” या उपक्रमांतर्गत सजविलेल्या वाहनात मातीचे कलश ठेवून निघालेल्या अमृत कलश यात्रेत आठवडी बाजार येथील हनुमान मंदिर, राम मंदिर व साई मंदिरातून पवित्र माती संकलित करण्यात आली. तसेच शहरातील घरा-घरातून पवित्र माती कलशामध्ये संकलित करण्यात आली.

या उपक्रमात भाजपचे लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे,जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगिताताई पिपरे, न.प.मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर,उप मुख्याधिकारी भांडारकर सर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,शहर महामंत्री केशव निंबोळ,विनोद देवोजवार,विवेक बैस,माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, लताताई लाटकर, सोमेश्वर धक्काते,देवाजी लाटकर, हर्षल गेडाम, आशिष रोहनकर, अरुण हरडे,दिपक सातपुते,संजय बारापात्रे,मंगेश रणदिवे,अनिल कुनघाडकर, जनार्धन साखरे,विलास नैताम,भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते या स्वच्छता अभियानामध्ये उपस्थित होते.