गडचिरोली पोलिस दलाला ७४ नवीन वाहने

गडचिरोली पोलिस दलाला ७४ नवीन वाहने

गडचिरोली, दि.04: माओवाद विरोधी अभियान व चार्ली पेट्रोलिंग करीता पोलिस दलाला 20 चार चाकी व 54 दुचाकी पेट्रोलिंग वाहनांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणारी यंत्रणा अद्ययावत आणि गतिमान राहण्याच्या तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसविण्याबरोबरच जनतेच्या सुरक्षेची महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस दलाला अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने पोलीस दलाच्या ताफ्यात आता नवीन अद्ययावत वाहने सामील झाली आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाचे मी अभिनंदन करतो, असे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यावेळी म्हणाले.
गडचिरोली पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या 364 निवासस्थानांच्या बांधकामाचे भूमिपूजनही यावेळी श्री फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.देवराव होळी, कृष्णा गजबे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, एस रमेश (अहेरी) व प्रतीश देशमुख,(अभियान) आदी यावेळी उपस्थित होते.